**कोल्हापूर : चित्रपट महामंडळ निवडणुकीत दबावशाहीचा आरोप; विजय पाटकर यांचा मंत्र्याच्या OSD वर गंभीर हल्ला**

**कोल्हापूर : चित्रपट महामंडळ निवडणुकीत दबावशाहीचा आरोप; विजय पाटकर यांचा मंत्र्याच्या OSD वर गंभीर हल्ला** 

**KDM NEWS प्रतिनिधी कोल्हापूर - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप आणि दबावशाहीचा मुद्दा तीव्र झाला आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि माजी अध्यक्ष विजय पाटकर यांनी एका मंत्र्याच्या OSD (Officer on Special Duty) ने कोल्हापुरात ठाण मांडल्याचा आणि उमेदवारांवर दबाव आणल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

पाटकर यांनी सांगितले की, “मी उमेदवारी अर्ज भरून कोल्हापूरला पाठवला होता, मात्र राजकारण करून काही लोकांनी तो भरूच दिला नाही.” त्यांनी पुढे म्हटले, “एक मंत्र्यांचा OSD गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरात आहे. तो लोकांवर दबाव आणत आहे. ‘हा व्यक्ती नको, तो व्यक्ती नको’ असे सांगितले जात आहे. मला कळत नाही, त्या मंत्र्याला आणि OSD ला विधानभवनातील कामे संपली आहेत का, की ते इथे चित्रपट महामंडळात ठाण मांडून बसले आहेत?”

पाटकर यांनी मेघराज भोसले यांच्यावरही टीका केली. “मागील १० वर्षांत महामंडळाला अक्षरशः थडग्यात टाकले. कर्मचाऱ्यांचे ७ महिने पगार देखील दिले नाहीत. तरीही तो मला फोन करून आपल्या पॅनेलमध्ये उभे राहा म्हणतोय. याला लाज वाटत नाही?” असा प्रश्न उपस्थित केला.

**निवडणुकीचे वेळापत्रक**  
- २५ मे : उमेदवार यादी जाहीर व अर्ज छाननी  
- २६ ते २८ मे : अर्ज माघारी  
- २९ मे : अंतिम यादी व चिन्ह वाटप  
- ७ जून : कोल्हापूर, मुंबई व पुणे येथे मतदान  
- ८ जून : मतमोजणी व निकाल

विजय पाटकर २०१४ ते २०१६ या काळात महामंडळाचे अध्यक्ष होते. यावेळी त्यांचा मेघराज भोसले यांच्याशी सामना अपेक्षित होता, मात्र राजकीय दबावामुळे परिस्थिती बदलली आहे.

या आरोपांमुळे मराठी चित्रपट उद्योगातील संघटनात्मक निवडणुकीत राजकारण घुसल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. महामंडळाच्या भविष्यातील भूमिकेबाबत कलाकारांमध्ये मतभेद दिसून येत आहेत.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल