**बार्शी: माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी मलिकार्जुन मंदिरात महापूजा संपन्न!**
**बार्शी: माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी मलिकार्जुन मंदिरात महापूजा संपन्न!**
**KDM NEWS बार्शी प्रतिनिधी बार्शी:**सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बार्शी येथे एका विशेष धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांना या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे आणि त्यांचा प्रचंड बहुमताने विजय व्हावा, यासाठी आज ऐतिहासिक श्री मलिकार्जुन मंदिरात भव्य **'महापूजा'** करण्यात आली.
बार्शीच्या नगराध्यक्षा सौ. तेजस्विनी कथले व त्यांच्या कथले परिवारातर्फे आज या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिवारासह मलिकार्जुन चरणी महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी साकडे घालण्यात आले.
या महत्त्वपूर्ण धार्मिक व राजकीय सोहळ्याला बार्शी आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक नामवंत पत्रकार बंधूंनी हजेरी लावली होती. प्रशांत कथले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या पूजेच्या निमित्ताने बार्शीतील महायुतीचे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
टिप्पण्या