पोस्ट्स

**आयुक्त तुकाराम मुंडेंचा परंड्यात पहाटेच 'सर्जिकल स्ट्राइक'! १ कोटी २ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, गोदामे सील**

इमेज
**आयुक्त तुकाराम मुंडेंचा परंड्यात पहाटेच 'सर्जिकल स्ट्राइक'! १ कोटी २ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, गोदामे सील**  **KDM NEWS प्रतिनिधी परंडा (जि. धाराशिव), ६ जून २०२६ :** अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या थेट आदेशानुसार शुक्रवारी (५ जून) पहाटे ५ वाजता परंडा शहरात एफडीएच्या पथकाने एकाच वेळी चार ठिकाणी धाडी टाकून १ कोटी २ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. गोदामे सील करण्यात आले असून, कारवाईच्या भीतीने शहरातील सर्व पानटपऱ्या आणि संबंधित दुकाने दिवसभर बंद राहिली. मुंडे आणि सह-आयुक्त श्रीकांत करकाळे यांना परंड्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सांगली, पुणे, धाराशिव आणि सोलापूर येथील एफडीए अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने अत्यंत गोपनीयरित्या ही कारवाई आखली. स्थानिक यंत्रणांना ऐनवेळी कळवण्यात आले, ज्यामुळे कारवाई पूर्णपणे आश्चर्यकारक ठरली. **बावची चौक परिसरात तीन गोदामांवर धाड :** येथे १ कोटी १ लाख ८८ हजार ५०८ रुपयांचा गुटखा जप्त झाला. बस स्थानक रोडवरील एका बेकरीजवळील ठिकाणी अतिरिक्त ७८,७५५ रुपयांचा गुटखा ...

**बार्शी पोलिसांची धडक कारवाई; कोल्ड्रिंक्स गोडाऊन चोरी प्रकरणात दोन आरोपी अटकेत, ६१ बॉक्स जप्त**

इमेज
**बार्शी पोलिसांची धडक कारवाई; कोल्ड्रिंक्स गोडाऊन चोरी प्रकरणात दोन आरोपी अटकेत, ६१ बॉक्स जप्त**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर ग्रामीण), ६ जून २०२६:** बार्शी शहर पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत कोल्ड्रिंक्सच्या गोडाऊनमधील चोरीचा छडा लावला. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, चोरीस गेलेल्या ८२ बॉक्सपैकी ६१ बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. दिनांक ३१ मे २०२६ रोजी मध्यरात्री सुभाष नगर येथील संदीप राजेश जगताप यांच्या गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी ८२ स्टिंग कोल्ड्रिंक्सचे बॉक्स चोरून नेले होते. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्र. ४३६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३३४(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने (डीबी टीम) तत्काळ तपास सुरू केला. पथकप्रमुख पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे यांच्या नेतृत्वात सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली. ५ जून २०२६ रोजी पोलिसांनी पंकज नगर, बार्शी येथील अनिकेत राजू केंगार आणि किरण मारुती पोठे या दोघांना ...

**मोहोळ तालुक्यातील दूध डेअरींवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; १३ नमुने जप्त**

इमेज
**मोहोळ तालुक्यातील दूध डेअरींवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; १३ नमुने जप्त**  **KDM NEWS प्रतिनिधी मोहोळ (सोलापूर):** अन्न व औषध प्रशासन विभागाने मोहोळ तालुक्यातील दूध उत्पादक आस्थापनांवर विशेष तपासणी मोहीम राबवली. यात सहा डेअरींमधून १३ दुधाचे नमुने विश्लेषणासाठी जप्त करण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे आणि पुणे विभागीय सहआयुक्त दिगंबर भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. गुरुवारी (४ जून २०२६) सहाय्यक आयुक्त (अन्न) सा. ए. देसाई यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पथकाने मोहोळ तालुक्यातील **चंद्रमौली एमआयडीसी, कातेवाडी, पेनूर, सारोळे** आणि **तांबोळे** या ठिकाणच्या सहा दूध उत्पादक आस्थापनांची सखोल तपासणी केली. पथकात अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील, डॉ. उमेश भुसे, डॉ. मंगेश लवटे, कि. ध. देशमुख आणि सु. द. जिंतूरकर यांचा समावेश होता. या मोहिमेत मोहोळ तालुक्यात शंकास्पदरीत्या मोठ्या प्रमाणात दूध संकलन होणे आणि कृत्रिम दुध निर्मितीची शक्यता लक्षा...

**साताऱ्यात शिवराज्याभिषेक सोहळा : उदयनराजे भोसले यांनी केले महाराजांना अभिवादन**

इमेज
**साताऱ्यात शिवराज्याभिषेक सोहळा : उदयनराजे भोसले यांनी केले महाराजांना अभिवादन**  **KDM NEWS प्रतिनिधी सातारा :** शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शिवतीर्थ, पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज साताऱ्यातील शिवतीर्थावर हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उदयनराजे भोसले यांनी महाराजांच्या शौर्य, दूरदृष्टी, रयतेच्या कल्याणासाठी उभारलेल्या स्वराज्याची आणि न्यायनिष्ठेची आठवण करून आजच्या पिढीला प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. महाराजांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला. **“महाराजांचे कार्य आजही मार्गदर्शक”**   उदयनराजे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य केवळ राजकीय नव्हते तर रयतेच्या सर्वांगीण उन्नतीचे होते. त्यांचे शासन, न्यायव्यवस्था आणि प्रजावत्सलता ही आजही प्रत्येकासाठी आदर्श आहे. या पावन दिनी महाराजांच्या विचारांचा जागर करणे हे प्रत्येक शिवभक्ताचे कर्तव्य ...

**महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर गुन्हा न दाखल करण्यासाठी ५० हजार लाच; दोन पोलिस रंगेहाथ जाळ्यात**

इमेज
**महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर गुन्हा न दाखल करण्यासाठी ५० हजार लाच; दोन पोलिस रंगेहाथ जाळ्यात**  **KDM NEWS प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर :** मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एका कॉन्स्टेबलने महाविद्यालयीन विद्यार्थ्याकडून गुन्हा दाखल न करण्याच्या बहाण्याने ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी सायंकाळी दोघांना रंगेहाथ अटक केली. लाचेची पहिली उचल म्हणून १० हजार रुपये स्वीकारल्यानंतर दोघांना ठाण्याच्या आवारातच बेड्या ठोकण्यात आल्या. या प्रकरणाने शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. **आरोपी :**   - संजय नागूसिंग बहुरे  सहाय्यक पोलीस निरीक्षक, मुकुंदवाडी पोलीस ठाणे)   - गोकुळ अनिलराव खटावकर (वय ४३, पोलीस अंमलदार/कॉन्स्टेबल, मुकुंदवाडी पोलीस ठाणे)   **घटनाक्रम :**   २२ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याविरुद्ध मुकुंदवाडी ठाण्यात एका मुलीशी झालेल्या वादाची तक्रार आली होती. दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्याने वाद मिटला होता. तरीही बहुरे आणि खटावकर यांनी विद्यार्थ्याला धमकी दिली क...

**बार्शी : तांबेवाडी तांड्यात वन विभागाची मोठी कारवाई; ३० ते ३५ टन अवैध लाकूड जप्त**

इमेज
**बार्शी : तांबेवाडी तांड्यात वन विभागाची मोठी कारवाई; ३० ते ३५ टन अवैध लाकूड जप्त**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर) : मौजे तांबेवाडी तांडा येथे वन विभागाने ३ जून २०२६ रोजी धडक कारवाई करत सुमारे ३० ते ३५ टन अवैध लाकडाचा साठा जप्त केला. या कारवाईत लिंब, आंबा, चिंचसह विविध प्रजातींच्या झाडांची बेकायदेशीर तोड केल्याप्रकरणी १२ ते १३ शेतकऱ्यांवर ‘महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४’ अंतर्गत वन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या मालकीच्या शेतात आणि घराच्या परिसरात विनापरवाना वृक्षतोड केल्याचे समोर आले. या माहितीच्या आधारे वन पथकाने तातडीने छापा टाकला. छाप्यात प्रचंड प्रमाणात कापलेले लाकूड साठवलेले आढळले. हे सर्व लाकूड जप्त करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. **अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी कारवाई**   सोलापूरचे उपवनसंरक्षक कुलराज सिंह आणि सहाय्यक वनसंरक्षक (रोहित) अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. बार्शी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. बडे यांनी मोहिमेचे नेतृत्व केले. यात...

**बार्शीत पोलिस-FDAची मोठी कारवाई; मालवंडीत ७०,१३० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा-तंबाखू जप्त**

इमेज
**बार्शीत पोलिस-FDAची मोठी कारवाई; मालवंडीत ७०,१३० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा-तंबाखू जप्त**  **KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी):** बार्शी तालुक्यातील मालवंडी येथे बार्शी तालुका पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्या संयुक्त पथकाने ४ जून रोजी केलेल्या छाप्यात तब्बल ७०,१३० रुपयांचा महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी मालवंडी येथील मेहबुब जवाहर आतार (वय ३४) याच्यावर बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. बार्शी उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांना मालवंडी येथील एका घरात बेकायदेशीर गुटख्याचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या आधारे बार्शी तालुका पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महेश माने यांच्या पथकाने ४ जून रोजी मेहबुब आतार यांच्या घरावर छापा टाकला. छाप्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळल्याने पोलिसांनी तो जप्त केला आणि FDA अधिकाऱ्यांना पाचारण केले. ५ जून रोजी सोलापूर येथील अन्न सुरक्षा अधिकारी उत्कर्षा मुकूंद एखंडे यांनी जप्त म...