एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरल्याने वाढतो का? काय करावं? येथे वाचा सर्व

एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरल्याने  वाढतो का? काय करावं? येथे वाचा सर्व गेल्या काही वर्षांपासून क्रेडिट कार्डचा वापर वाढला आहे. अनेक बँका क्रेडिट कार्डवर ऑफर्स देत असतात.

तसंत, ऑनलाइन एखादी वस्तू घ्यायची असल्यास पेमेंटवर सूट आणि ऑफर्सदेखील मिळतात.त्यामुळं अनेक जण क्रेडिट कार्ड घेतात. अनेक वेगवेगळ्या बँका कार्डवर विविध ऑफर्स दिले जातात. त्या ऑफर्सना भुलून नागरिक एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड घेतात. मात्र, एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड घेणे खरंच फायद्याचे आहे का. यामुळं तुमच्या सिबील स्कोअरवर नकारात्मक परिणाम पडतो का? हे जाणून घेणे गरजेचे आहे. 


क्रेडिट कार्डचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत. त्यामुळं तुमच्याकडे एकापेक्षा किती क्रेडिट कार्ड असावेत याची माहिती असणे गरजेचे आहे. सगळ्यात पहिले तर क्रेडिट कार्ड कसं मिळतं हे जाणून घेऊया. तुमचा पगार आणि बँकेचा सिबिल स्कोअर तपासून तुम्हाला बँकेकडून क्रेडिट कार्ड ऑफर केले जाते. पगार पाहूनच या क्रेडिट कार्डची लिमिटदेखील ठरवली जाते. कधी कधी क्रेडिट कार्डवरुनही तुमचा सिबिल स्कोअर ठरु शकतो. 


तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असल्यास बँकेच्या सिबिल स्कोअरवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. उदा. जर तुमचा पगार 50 हजार रुपये महिना आहे आणि तुमच्याकडे चार क्रेडिट कार्ड आहेत तर त्यामुळं तुमच्या सिबिल स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. या चारही क्रेडिट कार्डमधून तुम्ही खर्च करत असाल तर तुमच्या 50 हजारांच्या पगारात बिल कसे भराल, हे तुमच्यासाठी खूप अडचणीचे ठरु शकते. अशावेळीअशावेळी क्रेडिट कार्डचे बिल वेळेत भरले नाही तर तुमचा सिबिल स्कोअर कमी होऊ शकतो. 


सिबील स्कोर कमी झाल्यास नंतर लोन मिळण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळं जितके कमी क्रेडिट कार्ड असतील तेवढे ते वापरणे सोपं जाते. सिबील स्कोअर मेंटेन करण्यासाठी एक किंवा दोन क्रेडिट कार्ड वापरा. जर, तुमच्या महिन्याच्या पगारापेक्षा क्रेडिट कार्डची लिमिट जास्त असेल तर चुकीचा परिणाम होऊ शकते. त्यामुळं एक किंवा दोन क्रेडिट कार्डपेक्षा जास्त ठेवू नका

तुम्हाला एकापेक्षा जास्त क्रेडिट वापरायचे आहेत आणि त्याचबरोबर स्कोअरही बॅलेन्स करायचा असल्यास तुम्ही एक ट्रिक वापरु शकता. क्रेडिट कार्ड लिमिटच्या 30 टक्केच वापर करा. याचा परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो. तुमच्याकडे 1 लाख रुपयांची लिमिट असणारे Credit Card आहे आणि तुम्ही दर महिन्याला 70 हजार खर्च करताय तर तुम्ही क्रेडिट लिमिटच्या 70 टक्के वापर करताय. पण यामुळे तुमचा क्रेडीट स्कोअर खाली येऊ शकतो. अशावेळी तुम्ही एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करु शकता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल