पोस्ट्स

*बार्शी पाणीपुरवठा योजनेतील अडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक*

इमेज
*बार्शी पाणीपुरवठा योजनेतील अडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक*  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी सोलापूर, १५ ऑक्टोबर : बार्शी नगरपरिषदेच्या अमृत २.० अंतर्गत सुमारे २९६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेतील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या VIP कक्षात बैठक बोलावण्यात आली आहे. मा. जिल्हाधिकारी यांच्या मौखिक निर्देशानुसार नगर विकास शाखेकडून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बैठकीत कंदर ते अकोले फाटा (टेंभूर्णी-करमाळा महामार्ग NH ५६१-A), अकोले फाटा ते कन्हेरगाव ते MIDC टेंभूर्णी आणि ५४८-C MIDC टेंभूर्णी ते कुडूवाडी NH या भागांतील पाईपलाईन टाकण्यात येणाऱ्या अडचणी, भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करणे आणि आवश्यक परवानग्या देणे या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी उपप्रबंधक (तकनिकी) भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण बाळे, उपविभागीय अधिकारी माढा, तहसिलदार करमाळा व माढा, मुख्याधिकारी बार्शी नगरपरिषद, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग, उपअधीक्षक भूमि अभिलेख माढा...

*बार्शी तालुका पोलिसांची धडक कारवाई** आगळगाव व धसपिंपळगाव येथे प्रतिबंधित गुटखा-तंबाखू व अवैध दारू साठा जप्त*

इमेज
*बार्शी तालुका पोलिसांची धडक कारवाई**   आगळगाव व धसपिंपळगाव येथे प्रतिबंधित गुटखा-तंबाखू व अवैध दारू साठा जप्त*  KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, १३ ऑक्टोबर   बार्शी तालुका पोलीस ठाण्याने ११ ऑक्टोबर रोजी प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि अवैध दारू विक्रीविरोधात दोन वेगवेगळ्या गावांत कारवाई केली. या कारवाईत एकूण ₹२०,३२४ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आगळगाव येथील दशरथ किराणा स्टोअरवर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास छापा टाकण्यात आला. येथे उदय संजय कोल्हे (वय २४, रा. आगळगाव) याच्याकडून केआर १०००, केसरयुक्त विमल पानमसाला, व्ही-१ तंबाखू, डायरेक्टर स्पेशल पानमसाला आणि शॉट लक्झरी च्युइंग टोबॅको असा एकूण ₹१७,७३४ किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा क्रमांक ३३०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता व अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आला आहे. त्याच दिवशी धसपिंपळगाव येथे अवैध दारू साठ्यावर दोन स्वतंत्र कारवाया ...

*बार्शीत कल्याण मटका जुगार खेळताना सहा जणांना अटक; रोख रक्कम आणि मोबाईल जप्त*

इमेज
*बार्शीत कल्याण मटका जुगार खेळताना सहा जणांना अटक; रोख रक्कम आणि मोबाईल जप्त*  KDM NEWS प्रतिनिधी बार्शी:बार्शी पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ७८०/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.१३ वाजता पोस्ट चौक, बार्शी येथे इंडियन बेकरी समोर पत्रा शेडच्या आडोशाला सहा जण कल्याण मटका जुगार खेळत असताना पकडण्यात आले. त्यांनी रस्त्याने ये-जा करणाऱ्या लोकांकडून तसेच मोबाईल फोनद्वारे पैसे घेऊन अंदाजे आकड्यांवर पैज लावत असल्याचे आढळून आले. आरोपींची नावे:   १) दत्तात्रय संतोष गंधे (वय २१), सुभाष चौक तळवाडीजवळ, बार्शी   २) बालाजी राजाराम सुतार (वय ३६), कुर्जुवाडी रोड जैन मंदिराजवळ, बार्शी   ३) शरीफ गुलाब तांबोळी (वय ५४), बालाजी कॉलनी, बार्शी   ४) बापु दगडू गुळवे (वय ५०), जवळा खुर्द, ता. कळंब, जि. धाराशिव   ५) कर्ण सोमनाथ इंगळे (वय ३८), कुर्कुवाडी रोड जैन मंदिराजवळ, बार्शी   ६) सतीश सुभाष नवगण (वय ४३), भवानी पेठ, बार्शी   घटनास्थळी मटक्याच...

*बार्शीत डिलक्स स्पावर छापा; कुंटणखाना चालवणाऱ्या दोघांवर गुन्हा, दोन महिलांची सुटका*

इमेज
*बार्शीत डिलक्स स्पावर छापा; कुंटणखाना चालवणाऱ्या दोघांवर गुन्हा, दोन महिलांची सुटका*  KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, १२ ऑक्टोबर : बार्शी बायपास रोडवरील नागोबाचीवाडी शिवारातील डिलक्स स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, सोलापूर ग्रामीणच्या पथकाने १० ऑक्टोबर रोजी रात्री ११.१० वाजता छापा टाकला. या कारवाईत स्पाचा कुंटणखाना म्हणून वापर करणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. आरोपींची नावे अशी आहेत – बाबाभाई खाजाबाई चौधरी , सुरत, गुजरात जो डिलक्स स्पाचा मॅनेजर आहे आणि आकाश काशीद (रा. बार्शी), जो स्पाचा मालक आहे. फिर्यादी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोहेकॉ / ८३२ सूर्यकांत ठाकरू जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी संगनमत करून स्पा सेंटरचा कुंटणखाना म्हणून वापर केला. महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले आणि त्यांच्या कमाईवर स्वतःची उपजीविका चालवली. गुन्हा बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३२५/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १४३(२), १४४(२), ३(५) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रत...

*बार्शीत गुटखा माफियांना दणका! अन्न व औषध प्रशासनाकडून पेढी सील, 'मोक्का' कारवाईची मागणी*

इमेज
*बार्शीत गुटखा माफियांना दणका! अन्न व औषध प्रशासनाकडून पेढी सील, 'मोक्का' कारवाईची मागणी*  KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : सोलापूर, १२ ऑक्टोबर २०२६  अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईत बार्शी तालुक्यातील खांडवी येथील शिवसाक्षी पान टपरीमधून प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. एकूण मुद्देमालाची किंमत ४०,९६४ रुपये ५० पैसे इतकी आहे. पेढी सीलबंद करण्यात आली असून मालक विजय प्रभू गव्हाणे (वय ३७, रा. खांडवी) यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी तथा सहायक आयुक्त रामानंद उमाशंकर स्वामी यांनी बार्शी तालुका पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार, १० ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ८ वाजता पेढीमध्ये तपासणी करण्यात आली. पोलीस आणि पंचांच्या उपस्थितीत केलेल्या मोजणीत खालील प्रतिबंधित पदार्थ आढळले: - केसरयुक्त विमल पानमसाला (बिग पॅक) १२ पाकिटे – ५,७६० रुपये   - केसरयुक्त विमल पानमसाला (किंग पॅक) ३ पाकिटे – ५९४ रुपये   - व...

*दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी; शुल्क वसूल केल्यास महाविद्यालयांवर कारवाई*

इमेज
**दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी; शुल्क वसूल केल्यास महाविद्यालयांवर कारवाई**  KDM NEWS प्रतिनिधी;राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर झाल्यानंतर संबंधित भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाने परीक्षा शुल्क माफीचे परिपत्रक जारी केले आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमधील प्रथम सत्राच्या परीक्षांसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जाणार नाही. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही भूमिका स्पष्ट केली असल्याने शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संबंधित अधिकाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत की, शासनाच्या निर्देशांचे पालन सुनिश्चित करावे. उल्लंघन करणाऱ्या संस्थांची दखल घेऊन नियमानुसार कारवाई करावी. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन...

*बार्शीत स्पा सेंटरच्या आड देहविक्री उघड; लेडी सिंघम अंजना कृष्णा यांच्या पथकाची धडक कारवाई*

इमेज
*बार्शीत स्पा सेंटरच्या आड देहविक्री उघड; लेडी सिंघम अंजना कृष्णा यांच्या पथकाची धडक कारवाई*  KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, सोलापूर : बायपास रोडवरील मुनलाईट स्पा सेंटरवर स्पा आणि मसाजच्या नावाखाली देहविक्री सुरू असल्याच्या तक्रारींवरून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या विशेष पथकांनी छापा टाकला. या कारवाईत स्पा सेंटरच्या आडून देहविक्री चालत असल्याचे उघड झाले. चार ते पाच महिला मसाजच्या नावाखाली यात गुंतलेल्या आढळल्या. स्पा सेंटरचा मालक आणि संबंधित महिलांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध व्यवसायात खळबळ उडाली आहे. अंजना कृष्णा यांनी यापूर्वीही सोलापूर जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई केली आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये माढा तालुक्यातील कुर्डू गावात रस्त्याच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध मुरुम उत्खननावर त्यांनी छापा टाकला. राजकीय दबाव आला तरी त्यांनी कर्तव्यात ढील दिली नाही. प्रशासकीय चौकशीत उत्खनन अवैध असल्याचे आणि त्यांची...