महाभारत लिहिताना जेव्हा गणेशाचे तापमान वाढले, वेद व्यासांचे उपाय, आणि 'ही' परंपरा सुरू झाली, पौराणिक कथा पाहा

महाभारत लिहिताना जेव्हा गणेशाचे तापमान वाढले, वेद व्यासांचे उपाय, आणि 'ही' परंपरा सुरू झाली, पौराणिक कथा पाहाअवघ्या देशभरात श्रीगणेशा 

आगमन झाले आहे, भाविक 10 दिवस गणपतीची मनोभावे पूजा करत आहेत, बुधवारी दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

पौराणिक मान्यतेनुसार तसेच अनेक दंतकथांमध्ये गणेश विसर्जनाचा संबंध भगवान गणेशाने महाभारत लिहिल्याच्या घटनेशी जोडला आहे. जाणून घ्या रंजक पौराणिक कथा...


...म्हणून गणेशाने आपला एक दात तोडला


प्रचलित समजुतीनुसार, जेव्हा महर्षी वेद व्यास महाभारत लिहिण्यासाठी प्रतिभावान लेखक शोधत होते, तेव्हा गणेशजींनी त्यास होकार दिला. पण त्यांनी एक अटही घातली की जोपर्यंत महर्षी न थांबता बोलतात तोपर्यंत ते सतत लिहीत राहतील. गणेश चतुर्थीच्या दिवसापासून वेदव्यासांनी महाभारताची कथा सांगण्यास सुरुवात केली. गणेशजी सलग 10 दिवस कथा लिहीत राहिले. महर्षि वेदव्यास गणेशांना महाभारताची कथा सांगत होते. लिहिताना अचानक गणेशजीं लेखणी फुटली. त्यांना वाटले की नवीन लेखणी शोधायला वेळ लागेल आणि कथा लिहिण्याचा क्रम खंडित होईल, म्हणून त्यांनी आपला एक दात तोडला आणि तो लेखणी म्हणून वापरला.


महाभारत लिहिताना गणेशजींच्या तापमानात वाढ

महर्षी वेदव्यास महाभारताची कथा सांगत राहिले आणि गणेशजी ते लिहित राहिले. कथा पूर्ण झाल्यावर महर्षी वेदव्यास यांनी डोळे उघडले. जास्त मेहनत केल्यामुळे गणेशजींच्या शरीराचे तापमान वाढल्याचे त्यांच्या लक्षात आले. तापमान कमी करण्यासाठीव्यास यांनी काही उपाय केले. तेव्हापासून ती परंपरा म्हणून प्रचलित झाली. जाणून घ्या


...आणि गणेशाच्या शरीराचे तापमान कमी झा

भगवान गणेशाच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी महर्षी वेदव्यास यांनी त्यांना तलावात स्नान घातले. अनंत चतुर्दशीचा दिवस होता. या दिवशी श्रीगणेशाची उष्णता कमी करण्यासाठी तलावात स्नान घातले. यानिमित्ताने गणेशमूर्तीचे विसर्जन सुरू झाले, अशी लोकांची धारणा आहे


लोकमान्य टिळकांनी 126 वर्षांपूर्वी भारतात परंपरा सुरू के

ब्रिटीश काळात सांस्कृतिक किंवा धार्मिक सण एकत्रितपणे साजरे करण्यावर बंदी होती. अशा परिस्थितीत 1893 साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. पुण्यात प्रथमच टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. त्यांच्या प्रयत्नांनी स्वातंत्र्य चळवळीत लोकांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. टिळकांनी गणेशोत्सवासाठी जो पुढाकार घेतला, त्यामुळे गजाननाला राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक बनवले. अस्पृश्यता दूर करून समाज संघटित करण्याचे कार्य यानिमित्त करण्यात आले.

वरील सर्व माहिती kdmnetwork.blogapot.com  & KDM news केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून KDM news कोणताही दावा करत नाही. हे लक्षात घ्यावे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल