जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन बैठक ,मतमोजणीचा शेवटचा टप्पा असलेले व्यवस्थित काम करावे :जिल्हाधिकारी
मतमोजणी हा निवडणुकीचा शेवटचा टप्पा असल्याने सर्वांनी दक्षता घेऊन काम करावे -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी सोलापूर शहरातील रामवाडी येथील शासकीय गोदामात मतमोजणी 4 जून रोजी होणार मतमोजणी केंद्रात निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरीक्षक यांनाच मोबाईल फोन घेऊन जाण्यास परवानगी निवडणूक आयोगाचे अधिकृत पासेस असलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींना फक्त मीडिया सेंटर मध्येच मोबाईल फोन बाळगण्यास परवानगी सोलापूर, दिनांक 29(जिमाका)-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 42- सोलापूर(अ. जा.) व 43-माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली होती. त्याच अनुषंगाने आयोगाच्या निर्देशाप्रमाणे दिनांक 04 जून 2024 रोजी मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. मतमोजणी हा निवडणुकीचा शेवटचा टप्पा असल्याने यासाठी नियुक्त सर्व नोडल अधिकारी व मतमोजणी अधिकारी-कर्मचारी यांनी ही प्रक्रिया अत्यंत दक्षता घेऊन यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा न...