पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

**तब्बल १५ वर्षांनंतर आजपासून देशभरात जनगणनेचा प्रारंभ**

इमेज
**तब्बल १५ वर्षांनंतर आजपासून देशभरात जनगणनेचा प्रारंभ**  ** KDM NEWS प्रतिनिधी नवी दिल्ली, १ एप्रिल २०२६: २०११ नंतर प्रथमच आजपासून भारताची जनगणना सुरू होत आहे. ही १६वी राष्ट्रीय जनगणना असून, ती पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार आहे. केंद्र सरकारने दोन टप्प्यांत जनगणना घेण्याचे जाहीर केले आहे. पहिला टप्पा (घर-सूचीकरण आणि आवास जनगणना) आज १ एप्रिलपासून सुरू होऊन ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत चालेल. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आपल्या सोयीनुसार या कालावधीत ३० दिवसांचा कालखंड निवडेल. दुसरा टप्पा (लोकसंख्या गणना) फेब्रुवारी २०२७ मध्ये होईल. पहिल्या टप्प्यात घराची स्थिती, सुविधा आणि घरगुती मालमत्ता याविषयी **३३ प्रश्न** विचारले जातील. ही जनगणना पहिल्यांदाच मोबाइल अॅपद्वारे (ऑफलाइन काम करणारे, १६ भाषांत उपलब्ध) घेतली जाणार आहे. सुमारे ३० लाख गणक घराघरात जाऊन माहिती घेतील. नागरिकांना स्व-गणना (सेल्फ-एन्युमरेशन) पोर्टलवर १५ दिवस आधी स्वतःची माहिती ऑनलाइन भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. यासाठी कोणतेही कागदपत्र दाखवण्याची गरज नाही. सर्व माहिती गोपनीय राहील आणि फक्त विकास नियोजनास...

**शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई२१.४३९ किलो गांजा जप्त; सराईत आरोपी रजाक शेख अटकेत**

इमेज
**शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई २१.४३९ किलो गांजा जप्त; सराईत आरोपी रजाक शेख अटकेत**  **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, दि. ३० – सोलापूर शहर गुन्हे शाखेने अंमली पदार्थांच्या विक्री आणि लागवडीच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ४ लाख ३९ हजार ९०० रुपयांचा २१.४३९ किलो गांजा जप्त करण्यात आला असून, एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालय हद्दीत गस्त घालत असताना गुन्हे शाखेच्या पथकाला थोबडे वस्ती, जुना देगांव नाका परिसरात संशयास्पद इसम दिसला. तो झाडाखाली बसून प्लास्टिक पिशवीतून गांजाच्या पुड्या विक्री करत होता. पथकाने त्याला ताब्यात घेतल्यानंतर झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील पिशवीतून २२७ ग्रॅम गांजा सापडला. चौकशीत आरोपीने आपले नाव रजाक गफुर शेख (वय ४९, रा. थोबडे वस्ती, जुना देगांव नाका, सोलापूर) असे सांगितले. पुढील चौकशीत त्याने आपल्या घराच्या परिसरात गांजाची लागवड केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला आणि ५९ गांजाची झाडे जप्त केली. या झाडांचे वजन २१.२१२ किलो होते. पिशवीतील गांजासह एकूण २१.४३९ किलो गांजा जप्त करण्यात...

**शिवव्याख्याते, वारकरी परिषदेचे उपाध्यक्ष ह.भ.प. मधुकर महाराज बारुळकर यांचे भीषण अपघातात निधन**

इमेज
**शिवव्याख्याते, वारकरी परिषदेचे उपाध्यक्ष ह.भ.प. मधुकर महाराज बारुळकर यांचे भीषण अपघातात निधन**  **KDM NEWS प्रतिनिधी नांदेड : मराठा सेवा संघाचे प्रबोधनकार आणि वारकरी परिषदेचे उपाध्यक्ष, प्रसिद्ध कीर्तनकार व समाजप्रबोधनक शिवश्री मधुकर महाराज बारुळकर यांचा मंगळवारी सिडको नांदेड चौकात (ढवळे कॉर्नर) भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. नांदेडहून परतताना भरधाव वेगाने येणाऱ्या टिपरने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की महाराजांना गंभीर दुखापत होऊन घटनास्थळीच प्राणज्योत मालवली. बारूळ (ता. कंधार, जि. नांदेड) येथील भूमिपुत्र मधुकर महाराज बारुळकर हे संपूर्ण महाराष्ट्रात समाजप्रबोधन, कीर्तन आणि मराठा समाजाच्या एकतेच्या कामासाठी ओळखले जातात. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून पुरोगामी विचारांचा प्रचार करणारे आणि वारकरी परिषदेच्या उपाध्यक्षपदावर कार्यरत असलेले महाराज अहोरात्र समाजजागृतीसाठी कार्यरत होते. त्यांच्या अकस्मात निधनाने वारकरी संप्रदाय, मराठा समाज आणि कीर्तन विश्वावर शोककळा पसरली आहे. विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय स्तरांवरून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्या...

**बार्शी : जामगाव (आ) शिवारात ट्रान्सफॉर्मर तोडफोड; १.४५ लाखांचा मुद्देमाल चोरी**

इमेज
**बार्शी : जामगाव (आ) शिवारात ट्रान्सफॉर्मर तोडफोड; १.४५ लाखांचा मुद्देमाल चोरी**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : ** सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील जामगाव (आ) शिवारात के. आर. अॅग्रो प्रायव्हेट कंपनीच्या परिसरातील २०० केव्हीए क्षमतेच्या महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरची अज्ञात चोरट्यांनी तोडफोड करून मोठी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. ट्रान्सफॉर्मरमधील सुमारे ४०० लिटर ट्रान्सफॉर्मर ऑइल आणि ५०० किलो अॅल्युमिनियम वायडिंग वायर चोरून नेल्याने महावितरण कंपनीला १ लाख ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना २७ मार्च दुपार ते ३० मार्च सायंकाळी दरम्यान घडली. चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरचे तेल आणि वायर काढून नेले. यातील ऑइलची किंमत अंदाजे २० हजार रुपये तर अॅल्युमिनियम वायरची किंमत १ लाख २५ हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी महावितरण कंपनीच्या बार्शी ग्रामीण २ विभागातील वरिष्ठ तंत्रज्ञ श्रीकृष्ण भगवान चाटे (वय ४०) यांनी बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षका...

**सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा थैमान; वीज कोसळून एका महिलेसह ३४ मेंढ्या ठार, मेंढपाळ जखमी; पिकांचे मोठे नुकसान**

**सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा थैमान; वीज कोसळून एका महिलेसह ३४ मेंढ्या ठार, मेंढपाळ जखमी; पिकांचे मोठे नुकसान** सातारा : राज्यभरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घालत असताना सातारा जिल्ह्यातही सोमवारी दुपारीपासून मुसळधार वादळी पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटी, विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. यामुळे वाई आणि खंडाळा तालुक्यांत वीज कोसळल्याच्या तीन घटना घडल्या. यात एका २९ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एकूण ३४ मेंढ्या ठार झाल्या. एक मेंढपाळ जखमी झाला. जिल्ह्यातील सातारा, वाई, खंडाळा, कोरेगाव, जावळी, फलटण या तालुक्यांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाई तालुक्यातील आसले गावाच्या पांडवनगर परिसरात दुपारी शेतात मेंढ्या चरणाऱ्या कळपावर वीज कोसळली. यात १६ मेंढ्या जागीच ठार झाल्या. मेंढपाळ नंदकुमार पांडुरंग पिसाळ यांना विजेचा झटका बसून जखमी झाले. त्यांना वाईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याचबरोबर खंडाळा तालुक्यातील मोर्वे गावाच्या सोलाडी शिवारात अमोल धायगुडे यांच्या शेळ्यांच्या कळपावर संध्याकाळी वीज पडली. यात ९ शेळ्या ठार झाल्या. या दोन घटनांमुळे धायगुडे यांचे सुम...

**महाराष्ट्रात गॅस सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा चक्कर येऊन मृत्यू**

इमेज
**महाराष्ट्रत गॅस सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा चक्कर येऊन मृत्यू**  **KDM NEWS प्रतिनिधी अकोला : राज्यातील घरगुती गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे लागलेल्या रांगेत उभे असताना अन्वी मिर्जापूर (ता. अकोला) येथील माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा शनिवारी दुपारी अचानक चक्कर येऊन मृत्यू झाला. शिरसाट हे सकाळपासून अकोला शहरातील यदुराज एचपी गॅस एजन्सीसमोर आपल्या विधवा सूनेच्या गॅस बुकिंगसाठी रांगेत उभे होते. तासन्तास भीषण उन्हात आणि गर्दीत प्रतीक्षा केल्याने थकवा आला. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ते खाली कोसळले. उपस्थित नागरिकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे अन्वी मिर्जापूर गावात शोककळा पसरली असून, गॅस वितरणातील गोंधळ आणि प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर ग्रामस्थांचा संताप व्यक्त होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या दुर्दैवी घटनेला ‘गॅस टंचाईचा पहिला बळी’ म्हटले आणि केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. KDM NEWS प्रतिनिधी 

*“कुस्ती सोडतेय...” सोनाली मंडलिकचा भावनिक निरोप; ४० राष्ट्रीय पदके जिंकणाऱ्या खेळाडूला आर्थिक पाठबळ न मिळाल्याने टोकाचा निर्णय**

इमेज
*“कुस्ती सोडतेय...” सोनाली मंडलिकचा भावनिक निरोप; ४० राष्ट्रीय पदके जिंकणाऱ्या खेळाडूला आर्थिक पाठबळ न मिळाल्याने टोकाचा निर्णय**  **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर **सोलापूर येथील हरीभाई प्रशाला मैदानावर सुरू असलेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कापरेवाडी येथील पैलवान सोनाली मंडलिकला धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. सांगलीच्या अपेक्षा पाटीलकडून तिला पराभव झाला. मध्यंतराला सोनाली २-० ने आघाडीवर होती, मात्र शेवटच्या टप्प्यात अपेक्षा पाटीलने जोरदार पलटवार करत विजय मिळवला. या पराभवानंतर ओपन गटात निवड न झाल्याने सोनाली प्रचंड निराश झाली. तिने लगेचच सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ शेअर करत कुस्तीला अखेरचा रामराम केल्याची घोषणा केली. आर्थिक अडचणी, स्पॉन्सरशिपचा अभाव, योग्य आहार न मिळणे आणि ६५ किलोपेक्षा वजन वाढवता न आल्याने ओपन गटात संधी गमावल्याची खंत तिने व्यक्त केली. सोनाली मंडलिक ही सामान्य कुटुंबातील खेळाडू आहे. कापरेवाडी येथील पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या तालमीतून तिने कुस्तीला सुरुवात केली. कोणत्याही...

**बार्शी : खळबळजनक घटना! जन्मदात्या मातेचे क्रूर कृत्य; ६ महिन्यांच्या बाळाचा गळा चिरला, ६ वर्षांच्या मुलीवर प्राणघातक हल्ला**

इमेज
**बार्शी : खळबळजनक घटना! जन्मदात्या मातेचे क्रूर कृत्य; ६ महिन्यांच्या बाळाचा गळा चिरला, ६ वर्षांच्या मुलीवर प्राणघातक हल्ला**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी**बार्शी तालुक्यातील पांगरी गावात एका आईने आपल्या दोन लहान मुलांवर निर्घृण हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ६ महिन्यांच्या मुलाचा गळा चिरून हत्या करण्यात आली, तर ६ वर्षांच्या मुलीवर प्राणघातक वार केले गेले. या कृत्यानंतर आरोपी मातेने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. पांगरी येथील या घरात सकाळी घडलेल्या या घटनेने संपूर्ण बार्शी तालुका हादरला आहे. माता आपल्या दोन्ही मुलांवर एकाच वेळी हल्ला करून नंतर स्वतःला दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिले. स्थानिकांनी तत्काळ मदत करत पोलिसांना कळवले. पांगरी पोलीस ठाण्यातील पथकाने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती ताब्यात घेतली. दोन्ही मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ६ महिन्यांच्या बाळाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला, तर ६ वर्षांच्या मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. आरोपी मातेला ताब्यात घेण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिस अ...

**मृत पुत्राच्या नंबरने बँक खाते रिकामे; शेतकऱ्याची २.५ लाखांची फसवणूक**

इमेज
**मृत पुत्राच्या नंबरने बँक खाते रिकामे; शेतकऱ्याची २.५ लाखांची फसवणूक**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी :** मयत मुलाच्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करून तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या बँक खात्यातून २ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.  कळंबवाडी (आ) येथील ६५ वर्षीय शेतकरी परमेश्वर नामदेव रणदिवे यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे.  रणदिवे यांनी २३ जून २०१७ रोजी आयडीबीआय बँकेच्या आगळगाव शाखेत खाते उघडले होते. त्यावेळी स्वतःकडे मोबाईल नसल्याने त्यांनी मुलगा सौरभ रणदिवे याचा मोबाईल क्रमांक बँकेशी लिंक केला होता. मात्र ४ सप्टेंबर २०२३ रोजी सौरभ यांचे निधन झाले. त्यानंतर हा मोबाईल क्रमांक बंद झाला होता.  ६ ऑगस्ट २०२५ रोजी रणदिवे बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्यावर खात्यातील रक्कम शून्य असल्याचे समजले. बँक स्टेटमेंट तपासताना मोबाईल क्रमांक दूरसंचार कंपनीने बंद करून दुसऱ्या व्यक्तीला दिल्याचे उघड झाले.  तपासात ४ सप्टेंबर २०२३ ते ६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत फोनपे, गुगल पे सारख्या डिजिटल माध्यमातून रणदिवे यांच्या खात्यातून ...

**महाराष्ट्र राजकारणात 'मोठा भूकंप' होणार!** शिवसेना खासदार ज्योती वाघमारेंचं नांदेडमध्ये सूचक विधान; 'कुछ तो बडा होनेवाला है... ऑपरेशन टायगर की तुतारी?'*

इमेज
**महाराष्ट्र राजकारणात 'मोठा भूकंप' होणार!** शिवसेना खासदार ज्योती वाघमारेंचं नांदेडमध्ये सूचक विधान; 'कुछ तो बडा होनेवाला है... ऑपरेशन टायगर की तुतारी?'* **KDM NEWS प्रतिनिधी नांदेड, २८ मार्च २०२६:** महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शिवसेना (शिंदे गट)च्या राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी नांदेड दौऱ्यावर पत्रकारांशी बोलताना 'काही तरी मोठं घडणार' असं सूचक विधान केलं आहे. 'महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे. मग तो ऑपरेशन टायगर असेल की ऑपरेशन तुतारी, हे योग्य वेळी सांगेल,' असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. वाघमारे नांदेडच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी पत्रकारांनी 'काही जण शिवसेनेच्या संपर्कात आहेत' अशा चर्चेवर प्रश्न विचारला. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे विधान केलं. 'राजकारणात परफेक्ट टायमिंगला खूप महत्त्व असतं. ती वेळ आल्यावर आम्ही तुम्हाला नक्की सांगू, काय काय होणार आहे आणि कोण सोबत येणार आहे,' असंही त्यांनी जोडलं. हे विधान महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींशी जोडलं जात आहे. नाशि...

**बार्शीमध्ये **नारी शक्तीचा भव्य सन्मान सोहळा**; डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात**

इमेज
**बार्शीमध्ये **नारी शक्तीचा भव्य सन्मान सोहळा**; डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी :** अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा पाचवा वर्धापन दिन आणि ‘नारी शक्ती’ विशेष सन्मान सोहळा ३० मार्च २०२६ रोजी बार्शी येथे भव्य रूपात आयोजित करण्यात आला आहे. संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजा माने यांच्या नेतृत्वाखालील संघटनेने ६व्या वर्षात पदार्पण करताना समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थापक मा. श्री. राजा माने यांच्याकडे असेल. प्रमुख उपस्थितीमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, बार्शी आमदार दिलीप सोपल, राज्यसभा खासदार ज्योतीताई वाघमारे, सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सोहळ्यात सौ. अनु प्रसाद मोहिते (जीवन गौरव), ह.भ.प. शिवलीलाताई पाटील (कीर्तन रत्न), सौ. मनिषा भगवान लोकरे (समाजरत्न), सौ. सायरा नुह मुल्ला (क्रिडा रत्न), सौ. सारीका गिरीष संघवी (गौरव सन्मान) आणि श...

**सोलापूर : जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलवरील सर्व निर्बंध हटवले!**

इमेज
**सोलापूर : जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलवरील सर्व निर्बंध हटवले!**  **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर**सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मोठा निर्णय घेतला आहे. २० मार्च २०२६ रोजी जारी केलेला जुना आदेश रद्द करून पेट्रोल-डिझेल कॅन, ड्रम किंवा बाटलीमध्ये देण्यावरील बंदी हटवण्यात आली आहे. जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. २० मार्चच्या आदेशानुसार सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पेट्रोल-डिझेल उघड्या कंटेनरमध्ये विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली होती. स्प्रेयर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर, डिझेल जनरेटरसारख्या शेतीयंत्रांसाठी शेतकऱ्यांना कॅन-ड्रममध्येच डिझेल घेऊन जावे लागते. यामुळे १०-१५ किलोमीटर दूर पेट्रोल पंपांवर यंत्रे नेऊन-आणून वेळ आणि खर्च वाढत होता. शेतकऱ्यांच्या या अडचणी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करत जुना आदेश रद्द केला. जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी यापूर्वीच सांगितले होते...

**पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार**

इमेज
**पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार**  **KDM NEWS प्रतिनिधी पंढरपूर ** पंढरपूर (सोलापूर) - सरकारी उपजिल्हा रुग्णालयात ६ वर्षीय बालकाच्या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी उजव्या हाताचे दुखरे बोट काढण्याऐवजी डाव्या हाताचे बोट काढून टाकल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने तातडीने चौकशी समिती गठित केली असून, अहवालानंतर संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची घोषणा केली आहे. शाहू सुनील दंदाडे (वय ६, पंढरपूर) या बालकाला जन्मतःच दोन्ही हातांना सहा-सहा बोटे आहेत. काही दिवसांपूर्वी त्याच्या उजव्या हाताच्या अतिरिक्त बोटात वेदना सुरू झाल्याने पालकांनी त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. फॉर्मवर उजव्या हाताच्या बोटाबाबतच नोंद असताना डॉ. वर्षा काणे यांनी शस्त्रक्रिया करताना डाव्या हाताचे बोट कापले, असा पालकांचा आरोप आहे. नातेवाईकांनी सांगितले, “आमचा मुलगा लहान आहे. उजव्या हाताचे बोट दुखत होते, म्हणून आम्ही इथे आलो होतो. फॉर्मवरही उजव्या हाताबद्दलच लिहिले होते. डॉक्टरांकडे फाईल होती. त्यांनी ‘उजव्या हाताचेही बोट काढावे लागेल’ असे ...

**नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांच्या अश्लील व्हिडिओ शेअर करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई; दोघांना अटक, आठ जणांवर गुन्हा दाखल**

इमेज
**नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांच्या अश्लील व्हिडिओ शेअर करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई; दोघांना अटक, आठ जणांवर गुन्हा दाखल**  **KDM NEWS प्रतिनिधी नाशिक;नाशिक येथील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्या लैंगिक शोषण प्रकरणात पीडित महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी तातडीने कठोर पावले उचलली आहेत. विशेष तपास पथकाच्या (SIT) प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, असे व्हिडिओ शेअर करणे हा गंभीर गुन्हा असून पीडितांच्या ओळखीचा भंग होतो. यामुळे थेट कायद्याची कारवाई होईल आणि जेल होऊ शकते. कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात (अहिल्यानगर जिल्हा) दोन FIR नोंदवण्यात आल्या. राहुल गंगाधर शिंदे (रा. कोपरगाव) आणि योगेश पंढरीनाथ आढाव (रा. कोपरगाव) या दोघांना अटक करण्यात आली. तिसरा आरोपी संदीप गर्जे (रा. माजलगाव, बीड) याचा शोध सुरू आहे. राहुल शिंदे याने 'BMW' नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक पीडितेचा अश्लील व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ योगेश आढाव याने त्याला पाठवला होता आणि तो संदीप गर्जे...

**प्रांताधिकाऱ्याला लाच घेताना अटक ! महसूल विभागात खळबळ! प्रांताधिकारी शिंदे २ लाखांची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात**

इमेज
**प्रांताधिकाऱ्याला लाच घेताना अटक ! महसूल विभागात खळबळ! प्रांताधिकारी शिंदे  २ लाखांची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात**  **KDM NEWS प्रतिनिधी मंचर (पुणे) :** उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर-आंबेगाव उपविभागीय महसूल कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई केली आहे. आंबेगावचे प्रांताधिकारी गोविंद पांडुरंग शिंदे (वय ४६) यांना शुक्रवारी (२७ मार्च २०२६) दुपारी मंचर येथील कार्यालयात २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्यासह लिपिक राहुल खैरनार यांनाही अटक करण्यात आली. ही कारवाई महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्यावर झालेल्या थेट कारवाईमुळे विभागात एकच खळबळ उडाली आहे. प्रकरण नेमके काय आहे? नारायणगाव येथील एका बांधकाम व्यावसायिकाने (भागीदारी फर्मचे मालक) पुणे-नाशिक महामार्गालगत जमीन विकास नियमांनुसार निवासी इमारत बांधली होती. इमारतीचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असताना पूर्णत्व दाखला (बिल्डिंग कंप्लिशन सर्टिफिकेट) आणि संबंधित कागदपत्रे, नोंदी पूर्ण करण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला. यासाठी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी...

"पेट्रोल-डिझेल-गॅस पुरेसा साठा; गर्दी केल्यास थेट कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा"

इमेज
"पेट्रोल-डिझेल-गॅस पुरेसा साठा; गर्दी केल्यास थेट कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा"  **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर :** जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणताही तुटवडा भासणार नाही, असे स्पष्ट करत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नागरिकांना घाबरून जाऊ नये आणि अफवांवर विश्वास ठेवून अनावश्यक खरेदी किंवा गर्दी करू नये, असा महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. जिल्हा प्रशासनाने २३ मार्च रोजी दिलेल्या या आदेशात गॅस एजन्सींसमोर गर्दी टाळण्यासाठी कडक सूचना देण्यात आल्या आहेत. गॅस सिलिंडरचा घरपोच पुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश एजन्सींना देण्यात आले असून, एजन्सीच्या गोदामासमोर गर्दी केल्यास किंवा अवैध विक्री केल्यास संबंधित एजन्सीवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, “जिल्ह्यात इंधन आणि गॅसचा साठा पुरेसा आहे. नागरिकांनी अफवांमुळे पेट्रोल पंपांवर किंवा गॅस एजन्सींवर अनावश्यक गर्दी करू नये. यामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते आणि सामान्य नागरिकांना अडचण येते.”  आदेशातील प्रमुख मुद्दे खालीलप्र...

**सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतीपदांची बिनविरोध निवड**

इमेज
**सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतीपदांची बिनविरोध निवड**  **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, २७ मार्च २०२६** : भारतीय जनता पक्षाने आज सोलापूर जिल्हा परिषदेच्या पाच विषय समित्यांच्या सभापतीपदांची नावे जाहीर केली. या सर्व पदांसाठी बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्याकडे अर्थ व बांधकाम समितीचे सभापतीपद, रामप्पा चिवड शेट्टी यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापतीपद, चेतनसिंह केदार सावंत यांच्याकडे शिक्षण व आरोग्य समितीचे सभापतीपद, संस्कृती सातपुते यांच्याकडे समाजकल्याण समितीचे सभापतीपद आणि ॲड. अमृता नागनाथ वाघे यांच्याकडे महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद सोपविण्यात आले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार, माजी आमदार आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून ही नावे जाहीर केली. ही निवड जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांप्रमाणे सव्वा वर्षे किंवा अडीच वर्षे अशी असेल, याबाबत अजून स्पष्टता नाही. **निवडीचे राजकीय संतुलन**   जिल्हा परिषदेत भाजपला प्रथमच स्पष्ट बहुमत मिळाल्याने (६८ पैकी ३८ जागा) ही निवड महत्त्वाची ...

**उन्हाळ्यातही मुक्या प्राण्यांची तहान भागवणारी 'जलसेवा'; भैरवनाथ चौधरी यांचा ३ वर्षांचा स्तुत्य उपक्रम**

इमेज
**उन्हाळ्यातही मुक्या प्राण्यांची तहान भागवणारी 'जलसेवा'; भैरवनाथ चौधरी यांचा ३ वर्षांचा स्तुत्य उपक्रम**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी :** उन्हाळ्याच्या तापलेल्या वातावरणात पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागते. अशा काळात केवळ माणसांनाच नव्हे, तर मुक्या प्राण्यांनाही स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे ही सामाजिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी ओळखून गुळपोळी (ता. बार्शी) येथील पत्रकार भैरवनाथ चौधरी यांनी गेल्या तीन वर्षांपासून सलग ३६ महिने पशूंसाठी जलसेवा सुरू ठेवली आहे. कोणत्याही ऋतूचा विचार न करता ते परिसरातील गायी, म्हशी, बैल, शेळ्या-मेंढरांसाठी विशेष हौद भरून ठेवतात. केवळ पाणी भरून थांबत नाहीत, तर प्रत्येक तीन-चार दिवसांनी हा हौद स्वतः स्वच्छ करतात. ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या काळात ही सेवा पशुपालकांसाठी मोठा आधार ठरली आहे. भैरवनाथ चौधरी ‘महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थे’चे माध्यमातून केवळ प्राणीसेवा करत नाहीत. संस्थेमार्फत समाजाच्या सर्व घटकांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. यात महिलांसाठी आरोग्य शिबिरे, कर्णबधिरांसाठी श्रवणयंत्र वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, आज...

**बार्शी : वारंवार पाईपलाइन फुटत असताना नगरपालिकेचे दुर्लक्ष; होनखांबेंनी तक्रारींकडे कानाडोळा, आठ दिवसांतून एकदा पाणी तरीही लाखो लिटर वाया!**

इमेज
**बार्शी : वारंवार पाईपलाइन फुटत असताना नगरपालिकेचे दुर्लक्ष; होनखांबेंनी तक्रारींकडे कानाडोळा, आठ दिवसांतून एकदा पाणी तरीही लाखो लिटर वाया!**  KDM NEWS प्रतिनिधी बार्शी नगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा पाईपलाइन वारंवार फुटत असताना प्रशासनाकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांनी नगरपालिकेत वारंवार जाऊन तोंडी तक्रारी दिल्या तरी दुरुस्तीकडे कोणतीही कारवाई होत नाही. बार्शी नगरपालिकेतील पाणीपुरवठा अधिकारी अजय होनखांबे यांनी अशा तक्रारींकडे सातत्याने कानाडोळा केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. उन्हाळ्याचे दिवस असताना शहराला आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत असतानाही फुटलेल्या पाईपलाइनमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचा भडका उडाला आहे. नागरिकांच्या माहितीनुसार, एका महत्त्वाच्या पाईपलाइनला फुट पडल्याने परिसरातील घरांत पाणी घुसत आहे. फुटलेल्या ठिकाणी दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज असल्याने दुरुस्ती पथकाला काम करण्यास सतत अडथळा येत आहे. शेजारच्या घरांमध्येही पाणी शिरत असून, येथून काही अंतरावरच पाणीपुरवठा विभागातील अधिकारी होनखांबे यांचे निवासस्थान असत...

**‘इथे थांबणे नाही’ सुधारित आवृत्ती व ‘वाट रेखाटणारी पावलं – Grounded Glory’ चे भव्य प्रकाशन**

इमेज
**‘इथे थांबणे नाही’ सुधारित आवृत्ती व ‘वाट रेखाटणारी पावलं – Grounded Glory’ चे भव्य प्रकाशन**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी :  बार्शीतील शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात रविवार, २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता आयएएस अधिकारी रमेश घोलप यांच्या दोन प्रेरक पुस्तकांचे भव्य प्रकाशन होणार आहे.  ‘इथे थांबणे नाही’ या आत्मकथनाच्या सुधारित आवृत्तीचे आणि उमेद प्रतिष्ठानतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘वाट रेखाटणारी पावलं – Grounded Glory’ या मराठी-इंग्रजी द्विभाषिक कॉफी टेबल बुकचे एकाच सोहळ्यात प्रकाशन होईल.  रमेश घोलप यांचा जीवनप्रवास लाटांना न जुमानता ध्येयाकडे सतत वाटचाल करण्याचा, निश्चय काळजावर कोरल्यावर यश आपोआप येण्याचा आणि जिद्द-चिकाटीची प्रचिती देणारा वस्तुपाठ आहे. रमेश यांनी जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतले. कोचिंगशिवाय २०१२ मध्ये यूपीएससी परीक्षेत २८७ वी रँक मिळवून आयएएस झाले. त्या वर्षीच एमपीएससीमध्येही राज्यात पहिला क्रमांक पटकावला. ‘इथे थांबणे नाही’ या पुस्तकात त्यांच्या संघर्ष, निश्चय आणि यशाची पूर्ण कहाणी आहे.  दुसरे पुस्तक ‘वाट रे...

**सोलापूर : डिजिटल अॅरेस्टच्या भीतीने २१ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांची मोठी कारवाई, दिल्लीतील आरोपी अटकेत**

इमेज
**सोलापूर : डिजिटल अॅरेस्टच्या भीतीने २१ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांची मोठी कारवाई, दिल्लीतील आरोपी अटकेत**  **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर**सोलापूर शहर सायबर पोलिसांनी ‘डिजिटल अॅरेस्ट’ या नव्या सायबर फसवणुकीच्या टोळीवर मोठी कारवाई केली आहे. टेलिकॉम अधिकारी, पोलीस आणि सीबीआय अधिकारी बनून नागरिकांना धमकावून लाखो रुपयांची लूट करणाऱ्या टोळीतील एका मुख्य आरोपीला दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे. २८ जुलै २०२५ रोजी तक्रारदाराला अनोळखी मोबाईलवरून कॉल आला. स्वतःला टेलिकॉम कंपनीचा अधिकारी म्हणून ओळख देऊन “तुमचा नंबर गैरवापरला जात असून मुंबईतील कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे,” असे सांगण्यात आले. नंतर आरोपींनी स्वतःला पोलीस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवले. बनावट आधारकार्ड, एटीएम कार्ड, अरेस्ट वॉरंट आणि सुप्रीम कोर्टाची नोटीस व्हॉट्सअॅपवर पाठवून तक्रारदाराला ‘डिजिटल अॅरेस्ट’ केल्यासारखे वातावरण निर्माण केले. भीती आणि बदनामीच्या धमकीखाली एकूण २१,२५,१६१ रुपयांची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेतली. सायबर पोलिसांच्या तांत्रिक तपासात आरोपी दिल्ली येथील र...

**पुन्हा लॉकडाऊनची भीती? कोरोनाचा नवा ‘सुपर व्हेरिएंट’ BA.3.2 ने वाढवली चिंता; अमेरिकेतील २५ राज्यांत सापडले रुग्ण**

इमेज
**पुन्हा लॉकडाऊनची भीती? कोरोनाचा नवा ‘सुपर व्हेरिएंट’ BA.3.2 ने वाढवली चिंता; अमेरिकेतील २५ राज्यांत सापडले रुग्ण**  **KDM NEWS प्रतिनिधी नवी दिल्ली/वॉशिंग्टन, २५ मार्च २०२६: कोरोनाव्हायरसचा नवा ओमिक्रॉन उप-व्हेरिएंट BA.3.2 वेगाने पसरत असल्याने जगभरात पुन्हा एकदा टेन्शन वाढले आहे. अमेरिकेतील २५ हून अधिक राज्यांमध्ये हा व्हेरिएंट सांडपाण्याच्या नमुन्यांमधून आणि रुग्णांच्या क्लिनिकल सॅम्पल्समधून आढळला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, स्पाइक प्रोटीनमध्ये ७० ते ७५ बदल झाल्यामुळे हा व्हेरिएंट सध्याच्या लसींना चकवू शकतो आणि वेगाने पसरू शकतो. दक्षिण आफ्रिकेत नोव्हेंबर २०२४ मध्ये प्रथम आढळलेला हा BA.3.2 व्हेरिएंट आता अमेरिकेच्या अनेक राज्यांत (कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, फ्लोरिडा, टेक्साससह) विमानतळावरील सांडपाणी तसेच रुग्णांच्या नाकातील स्वॅबमधूनही समोर आला आहे. अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या अहवालानुसार, हा व्हेरिएंट JN.1 सारख्या पूर्वीच्या व्हेरिएंट्सपासून वेगळा आहे आणि त्यात मोठ्या प्रमाणात म्युटेशन्स आहेत. शास्त्रज्ञांचा खुलासा:   स्वित...

**आरटीई २५% राखीव जागांसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; आता २५ मार्चपर्यंत संधी**

इमेज
**आरटीई २५% राखीव जागांसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; आता २५ मार्चपर्यंत संधी** **KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, २५ मार्च २०२६: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत महाराष्ट्र शासनाने २५ मार्च २०२६ पर्यंत वाढवली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार १ किलोमीटर अंतराची अट रद्द करण्यात आल्याने ही मुदतवाढ देण्यात आली. यापूर्वी अर्जाची मुदत १८ मार्चपर्यंत होती. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिलेल्या सूचनेनुसार, आता पालकांना नवीन अर्ज भरण्यासोबतच पूर्वी सादर केलेल्या अर्जात दुरुस्ती करण्याचीही संधी मिळणार आहे. १ किलोमीटर अंतरामुळे जे पालक आरटीई प्रवेशापासून वंचित राहिले होते, त्यांना आता ३ किलोमीटरपर्यंतच्या शाळा निवडता येणार आहेत. शासनाच्या निर्देशानुसार ही सुविधा अधिकाधिक पात्र बालकांना लाभ देण्यासाठी देण्यात आली आहे. **सद्यस्थिती:**   २५ मार्चपर्यंत राज्यभरात २,६९,९७२ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संगणकीय लॉटरी जून २०२६ मध्ये काढली जाणार असून, निवड झालेल्य...

**बार्शी : कोयत्याने हल्ला, जेसीबी चालक जखमी; आरोपीच्या आईने टपरीतून शस्त्र पुरवले**

इमेज
**बार्शी : कोयत्याने हल्ला, जेसीबी चालक जखमी; आरोपीच्या आईने टपरीतून शस्त्र पुरवले**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : गुरुवारी रात्री ९.३० वाजता बार्शी शहरातील मंगळवार पेठ, गणेश तलाव रोडवर पान टपरीसमोर एका जेसीबी चालकावर हल्ला झाला. आरोपी ईश्वर रसाळ याने शिवीगाळ करून विटेचा तुकडा, लाथाबुक्के आणि नंतर कोयता घेऊन मारहाण केली. त्याच्या आईने पान टपरीतून कोयता आणून दिला. या हल्ल्यात जखमीच्या उजव्या हाताच्या दंडावर आणि भुवईच्या वर कपाळावर गंभीर जखमा झाल्या. आरोपीच्या वडिलांनीही दगड फेकून जीवितास धोका निर्माण केला.  जेसीबी चालक विनोद प्रकाश रणदिवे (२४, राहणार वैद्य वस्ती, परांडा रोड, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तो आपल्या आत्या-मुलगा गणेश चंद्रकांत गायकवाड यांच्यासोबत मोटारसायकलवर सासुरवाडीला जात होता. त्यावेळी ईश्वर रसाळ याने अचानक शिवीगाळ करून विटेचा तुकडा घेऊन धाव घेतली. प्रतिकार करताना विटा खाली पडल्यावर त्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्याची आई (नाव अज्ञात) तेथे आली आणि त्याने तिला पान टपरीतून कोयता आणण्यास सांगितले. आईने कोयता आणून दिला. ईश्वरने प्रथ...

**“आता ‘मासिक’ प्लॅन खरोखर महिनाभर! २८ दिवसांचा खेळ संपला, सरकारचा ग्राहकांसाठी दिलासा”**

इमेज
**“आता ‘मासिक’ प्लॅन खरोखर महिनाभर! २८ दिवसांचा खेळ संपला, सरकारचा ग्राहकांसाठी दिलासा”**  **KDM NEWS प्रतिनिधी नवी दिल्ली, २४ मार्च २०२६: एअरटेल, जियो आणि व्होडाफोन आयडिया (व्ही) या तीनही प्रमुख टेलिकॉम कंपन्यांच्या ग्राहकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाची भूमिका घेतली आहे. वर्षातून १३ वेळा रिचार्ज करण्याची झंझट आता संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संसदेत आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे. सध्या बहुतेक प्रीपेड प्लॅन २८ दिवसांच्या वैधतेत उपलब्ध आहेत. २८ × १२ = ३३६ दिवस. म्हणजे वर्षभर (३६५ दिवस) सेवा घेण्यासाठी ग्राहकांना १३ वेळा रिचार्ज करावा लागतो. यामुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडतो. राघव चढ्ढा यांनी संसदेत याला ‘ग्राहकांची लूट’ म्हटले आणि ३० दिवसांच्या प्लॅनची मागणी केली. मंत्री सिंधिया यांनी यावर तत्काळ प्रतिक्रिया देताना सांगितले की, सरकारने टेलिकॉम कंपन्यांना ३० दिवसांच्या प्लॅनला प्रोत्साहन देण्याचे निर्देश दिले आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी अथ...

**नाशिक : तुर्कीच्या समुद्रातील खोल गुहेतून काढलेला ‘एल्विश हनी’; एक किलोला ९ लाखांचा दर, भाविक-उद्योजक-नेत्यांना गंडा**

इमेज
**नाशिक : तुर्कीच्या समुद्रातील खोल गुहेतून काढलेला ‘एल्विश हनी’; एक किलोला ९ लाखांचा दर, भाविक-उद्योजक-नेत्यांना गंडा**  **KDM NEWS प्रतिनिधी**नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात याने बलात्कार प्रकरणात अटक झाल्यानंतर आता त्याच्या आणखी एका मोठ्या फसवणुकीचा पर्दाफाश झाला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत उघडकीस आले की, खरात ‘तुर्की मध’च्या नावाखाली शक्तिवर्धक आणि कामोत्तेजक मध विकत होता. हा मध तुर्कीच्या समुद्रातील खोल गुहांमधून मिळतो, अत्यंत दुर्मिळ आणि लैंगिक शक्ती वाढवणारा असल्याचा बनावट दावा करून तो एका किलोच्या बाटलीला तब्बल ९ लाख रुपये घेत होता. खरातने या मधाला ‘एल्विश हनी’ असे ब्रँड नाव दिले होते. तो ग्राहकांना सांगत असे की, हा मध फक्त तुर्कीच्या विशिष्ट समुद्री गुहेतून मिळतो आणि त्यात अशी औषधी शक्ती आहे की, लैंगिक अडचणी, शारीरिक अशक्तपणा दूर होतो. मुख्यतः उद्योजक, राजकीय नेते आणि उच्चभ्रू भाविकांना हे मध विकले जात होते. अनेक जण लैंगिक समस्या सोडवण्यासाठी खरातकडे येत आणि तो या मधाची शिफारस करत असे. चौकशीत समोर आले की, मधात काही औषधी गोळ्या मिसळून तो विकला जात होता. ...

**श्रीपतपिंपरीत पारधी महिलेवर दगडाने डोके फोडले, लाथाबुक्क्या व चावल्यानं जखमी; जुन्या भांडणातून सोन्या पाटीलवर SC/ST अत्याचार कायद्यानुसार गुन्हा**

इमेज
**श्रीपतपिंपरीत पारधी महिलेवर दगडाने डोके फोडले, लाथाबुक्क्या व चावल्यानं जखमी; जुन्या भांडणातून सोन्या पाटीलवर SC/ST अत्याचार कायद्यानुसार गुन्हा**  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : २३ मार्च २०२६ बार्शी तालुक्यातील श्रीपतपिंपरी, इंदिरानगर येथील विजय किराणा स्टोअर्स चालवणाऱ्या रजना पंप्पु पवार (वय ३९, हिंदू पारधी) यांच्यावर २१ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता दुकानासमोरच सोन्या उर्फ रणजीत बाळासाहेब पाटील याने दगडाने डोके फोडून, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आणि डाव्या पोटरीला चावून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. त्यानंतर "परत नादी लागलात तर जिवे मारीन" अशी जीवघेणी धमकी देऊन आरोपी पळून गेला. रजना पवार यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सांगितले की, त्यांचा पती पंप्पु व दीर अनिल शेळ्या चारण्यासाठी बाहेर गेले होते. त्या एकट्या दुकानात बसल्या असताना गावातीलच बाळासाहेब अनंतराव पाटील यांचा मुलगा सोन्या पाटील दुकानासमोर आला. "तुम्ही माझ्या वडिलांसोबत का भांडलात?" म्हणून शिवीगाळ सुरू केली. रजना समजावून सांगण्यासाठी बाहेर आल्या, तेव्हा आरोपी खडीच्या ढिगा...

**नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला ६८वा 'महाराष्ट्र केसरी'; सातवा 'डबल महाराष्ट्र केसरी'चा मान मिळवला**

इमेज
**नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला ६८वा 'महाराष्ट्र केसरी'; सातवा 'डबल महाराष्ट्र केसरी'चा मान मिळवला**  *KDM NEWS प्रतिनिधी पुणे :* नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने ६८व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पुणे जिल्ह्यातील वाघोली (ता. हवेली) येथील स्व. अजितदादा पवार क्रीडानगरीत २२ मार्च रोजी झालेल्या अंतिम लढतीत त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा ४-३ असा पराभव केला. यासह सदगीर सातव्या ‘डबल महाराष्ट्र केसरी’ ठरला. रामकृष्ण (अण्णा) सातव पाटील यांच्या आयोजनात आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने १८ ते २२ मार्चपर्यंत चाललेल्या स्पर्धेत ८०० हून अधिक पैलवानांनी भाग घेतला. गादी विभागात हर्षवर्धन सदगीरने जय पाटीलला १०-० ने चितपट केले, तर माती विभागात महेंद्र गायकवाडने सिकंदर शेखला ३-० ने हरवले. अंतिम सामन्यात दोन्ही पैलवान एकाच गुरू पैलवान काका पवार यांच्या तालमीचे शिष्य होते. पहिल्या सहा मिनिटांच्या हाफमध्ये १-१ बरोबरी झाली. दुसऱ्या हाफमध्ये गायकवाडला एक्टिव्हिटी टास्क मिळाल्यानंतर गुण न मिळाल्याने सदगीरला १ गुण मिळाला. त्यानंतर सदगीरने दोन...

**पुण्यातील भू-रेकॉर्ड घोटाळा उघडकीस! ३८,०२७ सातबाऱ्यांत नियमबाह्य फेरफार, १५२ महसूल अधिकाऱ्यांवर थेट कारवाई; निलंबन, फौजदारी गुन्हे, बदल्या सुरू**

इमेज
**पुण्यातील भू-रेकॉर्ड घोटाळा उघडकीस! ३८,०२७ सातबाऱ्यांत नियमबाह्य फेरफार, १५२ महसूल अधिकाऱ्यांवर थेट कारवाई; निलंबन, फौजदारी गुन्हे, बदल्या सुरू**  **KDM NEWS प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याच्या कलम १५५ चा गैरवापर करून पुणे जिल्ह्यातील ३८,०२७ सातबारा उताऱ्यांमध्ये बेकायदेशीर बदल केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या समितीने केलेल्या तपासात २,३८३ प्रकरणांच्या छाननीतून १५२ महसूल अधिकाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले. यापैकी १५ अधिकाऱ्यांवर अतिगंभीर, ८२ वर गंभीर तर ५५ वर मध्यम स्वरूपाच्या अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत कबुली दिली की, या प्रकरणात राज्यभरात दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून, पुण्यातील हे प्रकरण आतापर्यंतचे सर्वात मोठे घोटाळा आहे. समितीच्या अहवालानुसार, कलम १५५ फक्त लघु चुकांसाठी वापरता येते, मात्र अधिकाऱ्यांनी याचा वापर करून मालकी, जमिनीचे वर्गीकरण (वर्ग-२ ला वर्ग-१), क्षेत्रफळ, वारस नोंदी, ‘इतर हक्क’ स्तंभातील नावे बेकायदेशीरपणे बदलली. ऑफलाइ...

**नाशिकच्या स्वघोषित ज्योतिष कॅप्टन अशोक खरात प्रकरणात शिर्डी कनेक्शन उघड; ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त, एसआयटीकडून सखोल तपास**

इमेज
**नाशिकच्या स्वघोषित ज्योतिष कॅप्टन अशोक खरात प्रकरणात शिर्डी कनेक्शन उघड; ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त, एसआयटीकडून सखोल तपास**  **KDM NEWS प्रतिनिधी शिर्डी/नाशिक (महाराष्ट्र) - नाशिक क्राईम ब्रँचने अटक केलेल्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या प्रकरणात शिर्डी पोलिसांच्या प्राथमिक तपासामुळे मोठे धागेदोरे उघड झाले आहेत. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी शिर्डीतील एका प्रतिष्ठित कुटुंबातील २४ वर्षीय तरुणीने खरातच्या कार्यालयातील कर्मचारी नीरज जाधवविरुद्ध आक्षेपार्ह मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेल करण्याचा गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीमुळे खरातच्या शिर्डीतील मालमत्ता, संबंध आणि अनेक महिलांशी संबंधित ५८ व्हिडिओ समोर आले आहेत. शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. १३१/२०२६ नोंदवला गेला. त्यात कलम ३५१(२), भारतीय न्याय संहिता ६६(३), ६७(अ) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदी लागू करण्यात आल्या. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपअधीक्षक अमोल भारती आणि निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. आरोपी नीरज जाधवला ताब्यात घ...

**बार्शी : शाही नाईकवाडी ईदगाहवर हजारो मुस्लिम बांधवांची उपस्थिती; ईद-उल-फित्र उत्साहाने साजरी**

इमेज
**बार्शी : शाही नाईकवाडी ईदगाहवर हजारो मुस्लिम बांधवांची उपस्थिती; ईद-उल-फित्र उत्साहाने साजरी**  **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (२१ मार्च २०२६) – गुरुवारी संध्याकाळी शव्वाल महिन्याचा चंद्र दिसला नसल्याने रमजानचे ३० पूर्ण रोजे पूर्ण झाले. त्यामुळे ईद-उल-फित्रचा मुख्य दिवस आज शनिवार निश्चित झाला. बार्शी शहर व परिसरातील शाही नाईकवाडी ईदगाह येथे सकाळी ८ वाजता मदिना मस्जिदचे मौलाना अन्वारुल हक यांच्या मार्गदर्शनाखाली ईद नमाज अदा करण्यात आली. यावेळी बार्शी व आसपासच्या गावांतील हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते. नमाज संपल्यानंतर सर्व उपस्थितांनी एकमेकांना ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या. लहान मुलांमध्ये विशेष आनंद दिसून आला. यावेळी देशातील सुख-समृद्धी, शांती व सर्व धर्मांमध्ये एकता नांदावी यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. ‘जकात-उल-फित्र’च्या रूपात गरिबांना मदत करून समाजातील समानता व बंधुत्वाचा संदेश देण्यात आला. सर्वांनी एकमेकांचा आदर करावा, सुख-दुःखात सहभागी व्हावे व गरजूंची मदत करावी, असा ठाम संदेश देण्यात आला. बार्शी पोलीस प्रशासनाने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. विव...

**'तुमच्यावर कोप होईल' म्हणत धमकी; अटक केल्यानंतर अशोक खरातची पहिली प्रतिक्रिया**

इमेज
**'तुमच्यावर कोप होईल' म्हणत धमकी; अटक केल्यानंतर अशोक खरातची पहिली प्रतिक्रिया**  **KDM NEWS प्रतिनिधी नाशिक :** स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात (६७) याला नाशिक क्राईम ब्रँच युनिट-१ने बुधवार १८ मार्च २०२६ च्या रात्री उशिरा मिरगाव (सिन्नर) येथील फार्महाऊस/निवासस्थानातून अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी ‘प्रसाद’ (पोलिसी कारवाई) दाखवताच खरातने थेट धमकी दिली – “तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर कोप होईल!” ही त्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ३५ वर्षीय विवाहित महिलेच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यातील फिर्यादीनुसार, २०१९ मध्ये तिच्या भावाच्या ओळखीतून खरातशी भेट झाली. “दैवी शक्तीने सर्व अडथळे दूर करीन, श्रीमंत घरात लग्न होईल, करिअर उजळेल,” असे आश्वासन देत विश्वास संपादन केला. नोव्हेंबर २०२२ मध्ये कॅनडा कॉर्नर येथील ‘ओजस प्रॉपर्टीज’ कार्यालयात बोलावून चेंबरमध्ये पेढा व तांब्याच्या भांड्यातील पाणी (गुंगीचे औषध) दिले. डोकं जड होताच “तू माझी प्रेयसी बनून राहिली नाहीस तर परमेश्वराचा कोप होईल, तुझा नवरा मृत्युमुखी पडेल, मी तुला पवित्र करतोय,” अशी भीती घालून वारंवार बलात्कार केला. लग्...

**भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा; वैयक्तिक कारणांचा हवाला**

इमेज
**भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा; वैयक्तिक कारणांचा हवाला**  *KDM NEWS प्रतिनिधी नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण, बलात्कार व अंधश्रद्धेच्या नावाने फसवणुकीच्या आरोपाखाली १८ मार्चला अटक झालेल्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. चाकणकर यांनी राजीनामा पत्रात 'वैयक्तिक कारणांमुळे' स्वेच्छेने पद सोडत असल्याचे नमूद केले आहे. हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले आहे. खरातच्या शिवनिका संस्थान ट्रस्टमध्ये चाकणकर विश्वस्त असून, त्यांचे खरातचे पाद्यपूजन, छत्र धरणे व गुरू म्हणून संबोधल्याचे जुने व्हिडिओ-फोटो व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी तीव्र टीका करत तात्काळ राजीनामा किंवा बडतर्फीची मागणी केली होती. राष्ट्रवादी (अजित गट) नेत्री रुपाली ठोंबरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटले, “चाकणकर पदावर राहिल्यास पुरावे नष्ट होण्याची भीती; निष्पक्ष चौकशी अशक्य, राजीनामा द्या.” शिवसेना (उद्धव) नेत्र...

**बार्शीमध्ये महिलांची भव्य मोटारसायकल रॅली; हिंदू नववर्षाला उत्साही सुरुवात**

इमेज
**बार्शीमध्ये महिलांची भव्य मोटारसायकल रॅली; हिंदू नववर्षाला उत्साही सुरुवात**  *KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभ प्रसंगी महिलांच्या सशक्तीकरणाचा आणि हिंदुत्वाच्या एकजुटीचा संदेश देणारी भव्य मोटारसायकल रॅली आज गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी बार्शी शहरात निघाली. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी आणि मातृ शक्ती बार्शी या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात शेकडो महिलांनी उत्साहाने भाग घेतला. रॅलीला बार्शी नगराध्यक्षा सौ. तेजस्विनी कथले आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. गौरीताई रसाळ यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकावून सुरुवात झाली. सहभागी सर्व महिलांना श्रीराम नवमी मध्वर्ती उत्सव समितीच्या वतीने भगवे फेटे बांधण्यात आले. कलाधीश ढोल-ताशा पथकाने मंगल वादन करून वातावरण उत्साही बनवले. रॅलीचा मार्ग श्रीराम मंदिर आणि भगवंत मंदिर मार्गे सुरू होऊन महाद्वार चौक, वीर सावरकर चौक, पटेल चौक, तुळशीराम रोड, रोडगा रस्ता, आडवा रस्ता, आर.एस.एम. हायट, बस स्टॅन्ड चौक, पोस्ट चौक, जूने पोलीस स्टेशन, सोमवार पेठ, नगर परिषद, नरवीर तानाजी चौक, संकेश्वर उद...

**नेत्यांचं भविष्य सांगणारा 'कॅप्टन' अशोक खरात बलात्काराच्या आरोपाखाली अटक; ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ जप्त, राजकीय वादळ**

इमेज
**नेत्यांचं भविष्य सांगणारा 'कॅप्टन' अशोक खरात बलात्काराच्या आरोपाखाली अटक; ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ जप्त, राजकीय वादळ**  **KDM NEWS प्रतिनिधी नाशिक, १९ मार्च २०२६** – राज्यातील अनेक बड्या राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्तींचे भविष्य सांगणारा स्वयंघोषित 'कॅप्टन' म्हणून ओळखला जाणारा अशोककुमार एकनाथ खरात (वय ६७) याला नाशिक गुन्हे शाखेने बुधवारी (१८ मार्च) पहाटे लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली अटक केली आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानंतर खरातला न्यायालयाने ७ दिवसांची (२४ मार्चपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडाली असून, राजकीय नेत्यांशी असलेल्या संबंधांमुळे ते 'मिनी एपस्टीन फाइल्स' सारखे बनले आहे. **प्रकरणाची पार्श्वभूमी**   एक ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, खरातने २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत कॅनडा कॉर्नर परिसरातील त्याच्या कार्यालयात धार्मिक विधी, मंत्र-तंत्र आणि अंकज्योतिषाच्या बहाण्याने तिचा भावनिक व धार्मिक विश्वास संपादन केला. नंतर गुंगीकारक पदार्थ मिश्रित पाणी पाजून तिला ...

**सोलापूर : घरगुती गॅसचा व्यावसायिक अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई; ४१ सिलिंडर जप्त, गुन्हे दाखल**

इमेज
**सोलापूर : घरगुती गॅसचा व्यावसायिक अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई; ४१ सिलिंडर जप्त, गुन्हे दाखल**  *KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, १९ मार्च २०२६ : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर ताण येत असताना सोलापूर शहरात घरगुती सबसिडी एलपीजी सिलिंडरचा व्यावसायिक वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे उघडकीस आले. यावर कठोर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त एम. राजकुमार आणि पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने आज सायंकाळी शहरातील विविध ठिकाणी अचानक धाडी टाकल्या. अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने **पार्क चौक, जुळे सोलापूर, डी-मार्ट परिसर, विजापूर रोड आणि धर्मवीर संभाजी (कंबर) तलाव** परिसरातील चायनीज गाड्या, पावभाजी सेंटर आणि इतर व्यावसायिक ठिकाणांना लक्ष्य केले. या कारवाईत एकूण **४१ घरगुती गॅस सिलिंडर** जप्त करण्यात आले. यापैकी फौजदार चावडी (सदर बाजार) पोलीस ठाण्यात ६, विजापूर रोड पोलीस ठाण्यात १६ आणि जेल रोड पोलीस ठाण्यात १९ सिलिंडर जप्त झाले. रात्री उशिरापर्यंत संबंधित पो...