यशश्री शिंदे हिच्या हत्येच्या निषेधार्थ लाँग मार्च, उरण बंद; आरोपीच्या शोधात पोलीस कर्नाटकात
नवी मुंबई येथे घडलेल्या एका घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. यशश्री शिंदे ही 20 वर्षीय तरुणी गुरुवारी मित्राच्या घरी जाते म्हणून घराबाहेर पडली. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. या प्रकरणी तिच्या वडिलांनी उरण पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ निर्जन रस्त्यावर धक्कादायक अवस्थेत एक मृतदेह आढळला. हा मृतदेह यशश्री शिंदे हिचा असल्याचे उघड झाले. शवविच्छेदन करतेवेळी पीडितेची अवस्था पाहून डॉक्टरही चक्रावून गेले. यशश्रीचा प्रायव्हेट पार्टवर वार करण्यात आले होते. शरिरावरही अनेक जखमा आढळल्या. यशश्रीची हत्या इतर कोणी नसून दाऊद शेख नावाच्या व्यक्तीने केली होती. दाऊद शेखने वयाच्या 14व्या वर्षी यशश्रीवर लैंगिक अत्याचार केले होते. त्यावेळी त्याला पॉक्सो प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागला होता. नवी मुंबईतील उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कोते यांनी सांगितले की, मृत यशश्री शिंदे वाणिज्य शाखेची पदवीधर असून, तिने एका खासगी कंपनीत डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करत होती. गुरुवारी सकाळी ती तिच्या मित्रा...