**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**  

*बार्शी, दि. ०८ जून २०२५*  
**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी शहरातील मल्लीकार्जुन मंदिराजवळील देशमुख प्लॉट येथे राहणारा १३ वर्षीय हर्ष योगेश शर्मा या मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सकाळी ०६:३० वाजण्याच्या सुमारास हर्ष सायकल खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता. बराच वेळ तो घरी परत न आल्याने त्याचे वडील योगेश शर्मा (वय ४१) यांनी परिसरात शोधाशोध केली, परंतु हर्षचा थांगपत्ता लागला नाही.  

योगेश शर्मा यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, अज्ञात व्यक्तीने हर्षला फूस लावून पळवल्याचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी भा.दं.वि. कलम १३७(२) अंतर्गत गुन्हा क्रमांक ४९५/२०२५ दाखल करण्यात आला आहे. हर्षचा रंग गोरा, उंची १३५ सेमी, बांधा सडपातळ, केस काळे, डोळे मध्यम, डाव्या अंगठ्यावर तीळ असून, त्याने निळा टी-शर्ट आणि निळी पेंट परिधान केली होती. तो हिंदी, मराठी आणि मारवाडी भाषा बोलतो.  

बार्शी शहर पोलीस ठाण्याचे सपोनि प्रदीप झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पोलिसांनी सर्व ठाण्यांना शोध पत्रीका पाठवली असून, नागरिकांना हर्षबाबत माहिती असल्यास तातडीने बार्शी शहर पोलीस ठाणे (०२१८४-२२३३३३) किंवा तपासी अंमलदार (९३२६८६१७९९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल