**बार्शी नगरपरिषदेच्या नगरसेवक आरक्षण सोडतीत मोठी चूक; प्रभाग १६ मध्ये एसटी प्रवर्ग गोंधळ, १२, १७, १९ साठी फेरसोडत**

**बार्शी नगरपरिषदेच्या नगरसेवक आरक्षण सोडतीत मोठी चूक; प्रभाग १६ मध्ये एसटी प्रवर्ग गोंधळ, १२, १७, १९ साठी फेरसोडत** 

**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी, दि. ८ : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने ६ ऑक्टोबरला जाहीर केलेल्या नगरपरिषद नगरसेवक पदांच्या आरक्षण सोडतीत बार्शी नगरपरिषदेत प्रचंड मोठी चूक उघडकीस आली. प्रभाग क्रमांक १६ मध्ये अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी केवळ महिलांसाठी आरक्षण असावे, तरी प्रशासनाने एसटी पुरुष, एसटी सर्वसाधारण आणि एसटी महिला अशा तीन चिठ्ठ्या टाकल्याने गोंधळ निर्माण झाला. या चुकीमुळे प्रभाग १२, १७ आणि १९ च्या आरक्षणातही त्रुटी असल्याचे निदर्शनास आले असून, या चारही प्रभागांसाठी लवकरच फेरसोडत काढली जाणार आहे. माजी विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी ही चूक हाेरून प्रशासनावर दबाव टाकला, तर कामगार नेते अजित कांबळे यांनी निवडणूक आयोग आणि भाजपमध्ये बार्शी नगरपालिका निवडणुकीसाठी 'सेटलमेंट' झाल्याचा आरोप केला आहे.

नागरपरिषद प्रशासनाने दुपारी ४ वाजता झालेल्या बैठकीत ही चूक मान्य करून माफी मागितली. अक्कलकोटे यांनी सांगितले, "पूर्वीच्या परिपत्रकानुसार आरक्षण प्रक्रियेत सातत्य राखले पाहिजे. प्रभाग १६ मध्ये एसटी महिलांसाठी एकच चिठ्ठी टाकली जाणे आवश्यक होती. तीन चिठ्ठ्या टाकल्याने प्रक्रिया अवैध झाली. मी स्वतः निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असून, फेरसोडत हीच योग्य उपाययोजना आहे. यामुळे बार्शीकरांच्या मतदार हक्कांचे रक्षण होईल." त्यांनी नगरसेवक निवडणुकीची तारीख जवळ येत असल्याने तातडीने कारवाईची मागणी केली.

दरम्यान, कामगार नेते आणि स्थानिक राजकीय कार्यकर्ते अजित कांबळे यांनी हा प्रकार राजकीय षडयंत्र असल्याचा दावा केला. "निवडणूक आयोग आणि भाजप यांच्यात बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सेटलमेंट झाल्याने अशा चुका होत आहेत. प्रभाग १६ ची चूक ही जाणीवपूर्वक आहे, ज्यामुळे विशिष्ट पक्षाला फायदा होईल. १२, १७, १९ प्रभागांच्या फेरआरक्षणातही हेच षडयंत्र दिसेल. आम्ही यावर आंदोलन करू," असे कांबळे यांनी सांगितले. ते भाजपप्रणित नगरसेवकांना धक्का बसण्याची शक्यता नाकारली नाही.

नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले की, राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली १० ऑक्टोबरपर्यंत फेरसोडत पूर्ण होईल. या प्रभागांतील मतदारसंघांचे आरक्षण बदलल्यास उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होईल. बार्शी नगरपरिषदेत एकूण ४० नगरसेवक पदांसाठी आरक्षण प्रक्रिया सुरू असून, ही चूक केवळ चार प्रभागांपुरती मर्यादित आहे. स्थानिक राजकीय वर्तुळात यामुळे तणाव वाढला असून, विरोधी पक्षांनी आयोगावर कारवाईची मागणी केली आहे. निवडणुकीची रचना लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल