**बार्शी तालुका पंचायत समिती सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम १३ ऑक्टोबरला**

**बार्शी तालुका पंचायत समिती सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम १३ ऑक्टोबरला**
**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी, दि. ६ : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, बार्शी तालुक्यातील पंचायत समिती सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभागृहात होणार आहे. या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या आरक्षणाची कार्यवाही पूर्ण करणे बाबत आयोगाने दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी केलेल्या आदेश क्र. रानिआ/जिपर्पस-२०२५/प्रक्र.-३०/का-७ नुसार तात्काळ अमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

या सोडती कार्यक्रमात बार्शी तालुक्यातील सर्व पंचायत समिती सदस्य मतदारसंघांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, महिलांसाठी आणि इतर प्रवर्गांसाठी आरक्षण निश्चित केले जाईल. तालुक्यातील नागरिक व संबंधित यांना सकाळी ११ वाजता सभागृहात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यवाहीत पारदर्शकता राखली जाईल आणि निवडणूक प्रक्रियेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल