**महाराष्ट्र-कॅनडा सहकार्याला नवे बळ: मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री आनंद यांची भेट**

**महाराष्ट्र-कॅनडा सहकार्याला नवे बळ: मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री आनंद यांची भेट** 

**KDM NEWS प्रतिनिधी**मुंबई, १४ ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य आर्थिक, औद्योगिक, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात अग्रेसर आहे. कॅनडा आणि भारत यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होत असून, या काळात कॅनडातील उद्योजक, व्यापारी आणि गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्रातील संधी नव्या भागीदारीच्या उंची गाठतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. कॅनडाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री अनिता आनंद यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने वर्षा निवासस्थानी फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत तंत्रज्ञान, शिक्षण, वित्त, व्यापार, गुंतवणूक आणि उद्योग क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा झाली.

कॅनडा सरकारच्या शिष्टमंडळात भारतातील उच्चायुक्त क्रिस कोटर, इंडो-पॅसिफिक ग्लोबल अफेअर्सचे उपमंत्री ई. पी. पी. वेल्डन आणि चीफ ऑफ स्टाफ जेफ डेव्हिड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी होते. महाराष्ट्राकडून मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, गुंतवणूक व धोरण सल्लागार कौस्तुभ धवसे, उद्योग सचिव पी. अनबलगन, परराष्ट्र मंत्रालयाचे डॉ. राजेश गावडे आणि डॉ. अर्जुन देवरे उपस्थित होते.

या भेटीला राजनैतिक आणि विकासात्मक ऊर्जा म्हणून संबोधित करताना मंत्री अनिता आनंद म्हणाल्या, एसएमआर (स्मॉल मॉड्यूलर रिएक्टर) तंत्रज्ञान कॅनडासाठी महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही देशांतील सहकार्य नव्या शक्यता उघडत असून, महाराष्ट्राचे डेटा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. ही भेट भारत-कॅनडा संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांचा भाग असून, मुंबईत कॅनडियन आणि भारतीय कंपन्यांसोबत गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीवर चर्चा झाली.

KDM NEWS PRATINIDHI 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल