**बार्शी तालुक्यातील १२०० पूरग्रस्त कुटुंबांना इंडियन रेड क्रॉसकडून मदत वाटप**

**बार्शी तालुक्यातील १२०० पूरग्रस्त कुटुंबांना इंडियन रेड क्रॉसकडून मदत वाटप** 

**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी, ११ ऑक्टोबर : अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रभावित झालेल्या बार्शी तालुक्यातील १२०० कुटुंबांना इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या बार्शी शाखेने संसारोपयोगी साहित्य वाटप केले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हे वाटप झाले. यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, संस्थेचे सचिव अजित कुंकूलोळ, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने, तहसीलदार एफ. आर. शेख, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, माजी नगराध्यक्ष असिफभाई तांबोळी आणि रमेश पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विक्रम निमकर, संतोष सूर्यवंशी, अशोक डहाळे, डॉ. दिलीप कराड, अतुल सोनिग्रा, प्रतापराव जगदाळे आणि प्रशांत बुडून उपस्थित होते.

कार्यक्रमात कुंकूलोळ यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. १९७४ मध्ये स्थापन झालेल्या शाखेने ब्लड बँक आणि मूकबधिर शाळा सुरू केली. गरजूंना रक्त पुरवठा, दुष्काळ, पूर, भूकंपासारख्या संकटांत मदत केली. २००६-०७ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील २-३ हजार कुटुंबांना स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष मदत केली. हाँगकाँगकडून ५० लाख रुपयांची मदत मिळाली, ज्यातून महिलांच्या बचत गटांना स्वयंरोजगार दिला. २००७ मध्ये बार्शीतील पूर आणि १४ वर्षांपासून पंढरपूर वारीत वैद्यकीय सेवा पुरवली.

पालकमंत्री गोरे म्हणाले, "संकटकाळी माणुसकी जिवंत ठेवण्याचे काम इंडियन रेड क्रॉस करते. ही महाराष्ट्रातील आतापर्यंतची मोठी मदत आहे." त्यांनी शासनाकडून शेतकऱ्यांना ३१,५०० कोटी रुपयांची मदत आणि एनडीआरएफ निकषांपलीकडे जाऊन सहाय्य केल्याचे सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील ३० हजार कुटुंबांना दिवाळीपूर्वी किराणा, डाळी आणि इतर साहित्य वाटपाची घोषणा केली.

माजी आमदार राऊत म्हणाले, "मानवता धर्म म्हणून संस्थेने शेतकऱ्यांना मदत केली. पालकमंत्री आणि स्वयंसेवी संस्थांचे योगदान महत्त्वाचे." कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीने १ कोटी ५१ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर केले.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल