पोस्ट्स

**मळेगावात गाव तळ्याजवळ बेकायदा दारू विक्री; एकाला अटक**

इमेज
**मळेगावात गाव तळ्याजवळ बेकायदा दारू विक्री; एकाला अटक**  **KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी, दि. २४ जून २०२५**: बार्शी तालुक्यातील मळेगाव-बार्शी रस्त्यावरील बस स्टँडमागे, गाव तळ्याच्या बांधावर बेकायदा हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या ६० वर्षीय इसमाला पांगरी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत पोलिसांनी १० लिटर हातभट्टी दारू जप्त केली असून, आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पांगरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार, पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर शिंदे, पोहेकॉ घोडके आणि पोहेकॉ सातपुते यांनी खामगाव बीटमध्ये गस्त घालत असताना दुपारी १:३० वाजता गुप्त बातमी मिळाली. मळेगावात एक इसम बेकायदा दारू विक्री करत असल्याची खबर मिळाल्याने पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेऊन छापा टाकला. तिथे महादेव गजेंद्र सुरवसे (वय ६०, रा. मळेगाव) हा दारू विक्री करताना आढळला. पोलिसांनी त्याच्याकडील प्लास्टिक कॅनमधून १० लिटर हातभट्टी दारू जप्त केली. यापैकी १८० मिली नमुना घेऊन उर्वरित दारू जागेवर नष्ट केली. नमुन्याच्या बाटलीवर पंच आणि प...

**खाजगी क्लासमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; दोन प्राध्यापकांविरुद्ध गुन्हा दाखल**

इमेज
**बीडमधील खाजगी क्लासमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; दोन प्राध्यापकांविरुद्ध गुन्हा दाखल** **KDM NEWS प्रतिनिधी**बीड, दि. 27 जून 2025: बीड शहरातील एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा दोन प्राध्यापकांनी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दो न्ही प्राध्यापकांविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. या घटनेने बीड शहरात खळबळ उडाली असून, खाजगी कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलगी ही नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी खरवंडी कासार येथील संत भगवान बाबा उच्च माध्यमिक महाविद्यालयात 11वीत शिकत असून, एप्रिल 2024 पासून उमा किरण कोचिंग क्लासेसमध्ये नीटच्या तयारीसाठी प्रवेश घेतला होता. तक्रारीनुसार, प्राध्यापक प्रशांत खटावकर आणि विजय पवार यांनी गेल्या काही महिन्यांपासून मुलीला एकटे असताना क्लासरूम आणि केबिनमध्ये बोलावून तिच्याशी अश्लील वर्तन केले. यामध्ये अनुचित...