*लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाराशिव येथे मोठी कारवाई; 4 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप*
**लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाराशिव येथे मोठी कारवाई; 4 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप** **KDM NEWS प्रतिनिधी**धाराशिव, दि. 1 जुलै 2025**: धाराशिव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार मोबीन नवाज शेख (वय 41) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच मागणीप्रकरणी ताब्यात घेतले आहे. एका गुन्ह्यातून तक्रारदाराच्या भावाचे नाव वगळण्यासाठी शेख याने 4 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय तक्रारदाराने धाराशिव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातून आपल्या भावाचे नाव वगळण्यासाठी शेख याने लाच मागितल्याची तक्रार केली होती. तक्रारदार, त्यांचे वडील आणि भाऊ यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल आहे. शेख याने सुरुवातीला 5 लाख रुपयांची मागणी केली होती, मात्र तडजोडीअंती ही रक्कम 4 लाखांवर आली. **एसीबीचा सापळा, पडताळणी दरम्यान खुलासा** तक्रार मिळाल्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 17 जून 2025 रोजी धाराशिव शहर...