**51 वर्षीय व्यक्तीकडून बस प्रवासात महिलेचा विनयभंग; बार्शीत संतापजनक प्रकार**
**51 वर्षीय व्यक्तीकडून बस प्रवासात महिलेचा विनयभंग; बार्शीत संतापजनक प्रकार**
**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी, दि. 1 जुलै 2025**: कुर्डूवाडी ते बार्शी या एस.टी. बस प्रवासादरम्यान 24 वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात विनायक सोनबा जाधव (वय 51, रा. सावरगाव रोकडा, ता. अहमदपुर, जि. लातूर) याच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली.
30 जून 2025 रोजी सायंकाळी 7:30 ते रात्री 8:30 च्या दरम्यान, फिर्यादी महिला (रा. कासारावाडी रोड, बार्शी) टेंभुर्णी येथे मुलींना भेटून पुणे-लातूर एस.टी. बसने (क्र. MH 20 BL 3732) परतत होत्या. कुर्दुवाडी बसस्थानकावर बस थांबली असताना, त्या पेरू खरेदी करत असताना विनायक जाधव याने त्यांच्याकडे आक्षेपार्ह नजरेने पाहत, "तू पेरू काय खातेस, माझा .... खा," अशी अश्लील टिप्पणी केली. फिर्यादीने याबाबत कंडक्टर संतोष शिंदे आणि चालक गोविंद नलावडे यांना सांगितले. त्यांनी आरोपीला समजावले.
बार्शी बसस्थानकावर रात्री 8:30 वाजता फिर्यादी उतरल्या, तेव्हा विनायकने पुन्हा "तू मला खूप आवडतेस" असे म्हणत त्यांचा हात धरून ओढण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीच्या ओरडण्याने लोक जमा झाले. आरोपीने आपले नाव विनायक जाधव असल्याचे सांगितले. फिर्यादीने बार्शी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. बसस्थानकावर गस्त वाढवण्याचे आणि सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन आहे. स्थानिकांमध्ये संताप असून, महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कारवाईची मागणी होत आहे.
KDM NEWS प्रतिनिधी