चंद्रयान 3 यशस्वी मोहिमेनंतर सोशल मीडियावर मीन्सचा पाऊस.

Chandrayaan-3 Landing Memes: जगाच्या अंतराळ इतिहासात भारताने आपले नाव सोनेरी अक्षरांनी कोरले. आजचा दिवस भारतासाठीच नव्हे तर जगासाठी महत्त्वाचा ठरला. चांद्रयान-3 (chandrayaan 3) आज (बुधवार) चंद्रावर यशस्वीपणे उतरले.विक्रम लँडरने 6.04 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही लँडिंग यशस्वी झाले, असे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितले. दुसरीकडे, चांद्रयान-3 च्या यशस्वी मोहिमेनंतर सोशल मीडियावर मीम्स पाऊस पडला आहे. यूजर्स आपल्या प्रतिक्रीया व्यक्त करु लागले आहेत.

चांद्रयान-3 चा प्रवास

14 जुलै रोजी भारताने LVM3 रॉकेटद्वारे 600 कोटी रुपयांचा खर्च करत 'चांद्रयान-3' प्रक्षेपित केले. 5 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. आणि आज सध्याकाळी 6:04 मिनिटांनी चांद्रयान 3 च्या विक्रम लॅंडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडिंग केले.
दरम्यान, जुलैमध्ये प्रक्षेपण मोहीम सुरु झाल्यापासून ते चंद्रावर उतरण्याच्या प्रयत्नापर्यंत, भारताच्या तिसऱ्या चंद्र मोहिमेने बराच मोठा पल्ला गाठला आहे. भारताने हा पराक्रम केला तेव्हा 80,59,688 हून अधिक लोक ऑनलाइन आले होते. दरम्यान, Facebook वर, चांद्रयान-3 लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श केल्यावर 355.6K पेक्षा जास्त लोक ऑनलाइन होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल