न्यूज, मान्सूनबाबत महत्त्वाची बातमी आली, पुढील सहा दिवस पाऊस?

न्यूज, मान्सूनबाबत महत्त्वाची बातमी आली, पुढील सहा दिवस पाऊस...

Maharashtra Weather Forecast Today: गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात पावसाने ब्रेक लावला आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण होतं. मात्र, आता पावसाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

गेल्या दोन आठवड्यात पावसाने दांडी मारल्यानंतर पुन्हा पावसाचा हलक्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. असाच पाऊस येणाऱ्या पाच ते सहा दिवस पडणार आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. त्यामुळे राज्यासाठी थोडीफार का होईना ही दिलासा देणारी बातमी आहे.
पुणे जिल्हा, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापुरात अत्यल्प पाऊस
पश्चिम महाराष्ट्र म्हणजे अहमदनगर, पुणे, पुणे जिल्हा, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या सहा जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत अत्यल्प पाऊस म्हणजे ०५ ते १.५ मीमी पाऊस असणार आहे. तसेच, कोकण भागात जेसे की सिधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या पाच जिल्ह्यातील पावसाची स्तिथी अतिशय कमी असणार आहे. ०१ मिलिमीटर तर काही दिवशी १५ मिलिमीटर पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आवली आहे.काही जिल्ह्यात पावसाचं प्रमाण अत्यंत कमी
मराठवाडा विभागात जसे की धरावी, धाराशिव, हिंगवली बीड, औरंगाबाद, जालना, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये अल्पशा पावसाचं प्रमाण राहणार आहे. २ मिलिमीटर ते ४ मिलिमीटर पाऊस राहणार आहे. इतर सर्व जिल्ह्यात ०.१ ते १.३ मिलिमीटर पर्यंत पाऊस राहणार आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे.येणाऱ्या दिवसात पावसाचं प्रमाण कमीच राहणार आहे. काही जिल्हे हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहेत, अशी माहिती हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल