मराठा आंदोलन पेटल्यानंतर केंद्रात हालचालींना वेग, अमित शाहंचा थेट फडणवीसांना फोन

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसल्याने सरकारवर दबाव वाढला आहे. दुसरीकडे राज्यात काही ठिकाणी मराठा आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याचं पाहायला मिळत आहेजाळपोळीचे अनेक व्हिडीओ आता समोर येत आहे. या घटनानंतर आता केंद्रात हालचाली वाढल्या आहेत. केंद्रीय गृह विभागाने राज्यात मराठा आरक्षणावरून उपस्थित झालेल्या कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

राज्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला काल अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. बीडमध्ये आंदोलकांनी नेत्यांच्या घरावर दगडफेक केली, घर, कार्यालय पेटवून देण्यात आलं. तर बस स्थानकातील 60 बसेसची तोडफोड करण्यात आली. यानंतर बीड शहरात संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव इंटरनेटही बंद करण्यात आलं असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणात आता गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सोमवारी झालेल्या जाळपोळीच्या घटनानंतर एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरू नये, अन्यथा गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

केंद्रीय गृहविभागाकडून दखल
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत आरक्षणासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तरतर दुसरीकडे केंद्रीय गृह विभागाने राज्यात मराठा आरक्षणावरून उपस्थित झालेल्या कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यातील परिस्थितीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची सूत्रांची माहिती आहे.

फडणवीसांचा गंभीर आरोप
मराठा आंदोलनादरम्यान जे हिंसक घटना घडत होत्या. त्यावेळी काही राजकीय नेते आणि त्यांचे कार्यकर्ते देखील सामील असल्याचे लक्षात येत आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर माहिती दिली जाईल, असा गंभीर आरोप राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले यावर प्रतिक्रिया दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल