शिवसेना अपात्र आमदार प्रकरणी मोठी बातमी, नार्वेकरांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

 शिवसेना आणि ठाकरे गटातील अपात्र आमदार प्रकरणाची नवी अपडेट्स समोर आली आहे. आमदार पात्र-अपात्र प्रकरणावर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी पार पडली.यावेळी सर्व याचिका या एकत्र केल्या जाणार आहे, या प्रकरणावर पुढील सुनावणी 26 ऑक्टोबरला होणार आहे.

आज विधानभवनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी पार पडली. यावेळी सर्व याचिका एकत्र करा, या ठाकरे गटाच्या मागणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला आहे.

वेगवेगळ्या कारणांनुसार याचिका एकत्र केल्या जाणार आहे, असा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एकूण सहा कारणांसाठी याचिका एकत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. सहा याचिकांमध्ये 34 याचिका एकत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीस गैरहजर राहणे, विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत मतदान करणे, बहुमत प्रस्तावावेळी मतदान करणे अशी अधिकची कागदपत्रे 25 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

तसंच, नार्वेकर यांनी काही सूचना दिल्या असून शिंदे गटाला परवानगी दिली आहे. जर मी सुनावणी घेत आहे तर सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे माझ्यासमोर सादर करा,अशा शब्दांत विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाला सुनावले आहे.

ठाकरे गटाच्या वकिलांनी आज पुन्हा नवीन अर्ज केला होता. यावेळीशिवसेना शिंदे गटाकडून कागदपत्रांकरता मागणी करणारा अर्ज ठाकरे गटाने केला होता. यावर राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाच्या वकिलांना स्पष्ट शब्दांत सुनावलं.

"प्रत्येक सुनावणीस आपण नव नवीन अर्ज देत आहात यामुळे सुनावणी लांबत आहे. सुनावणी लवकर व्हावी असं वाटत असेल तर नवीन अर्जापेक्षा जे अर्ज दाखल आहेत त्यावर सुनावणी होवू द्या" असं नार्वेकर म्हणाले.

आमदार पात्र-अपात्र सर्व याचिका वर्गीकरण करुन करण्यात आल्या आहेत. एकूण 34 याचिकांचे 6 गटात वर्गीकरण करण्यात आलंय.

- याचिका क्रमांक 1 ते 16 
- याचिका क्रमांक 17
- याचिका क्रमांक 18 
- याचिका क्रमांक 19 
- याचिका क्रमांक 20 
- याचिका क्रमांक 22 ते 34

पुढील प्रकारे याचिकांचे वर्गीकरण केले गेले आहे.

- कॉज ॲाफ अॅक्शनुसार याचिकांकाचे वर्गीकरण
- अध्यक्ष निवडीच्या वेळेस व्हिपचे उल्लंघन
- मुख्यमंत्री विश्वास प्रस्ताव व्हिप उल्लंघनमुख्यमंत्री विश्वास प्रस्ताव व्हिप उल्लंघन
- व्हिप काढूप देखील विविध बैठकांना अनुपस्थित राहून व्हिपचे उल्लंघन केल्याबद्दल
- नेतृत्वाच्या विरोधा काही प्रस्तावांवर सह्या करुन उल्लंघन केल्याबद्दल आणि अन्य दोन कारणांनुसार काही यांचिकांचे दोन वेगवेगळे वर्गीकरण केले गेले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल