**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात** **KDM NEWS प्रतिनिधी पुणे/महाराष्ट्र:** अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत राज्यातील कृत्रिम दूध भेसळीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुख्य केंद्र मंचर (आंबेगाव तालुका, पुणे) असलेल्या या टोळीने स्किम मिल्क पावडर, डेअरी व्हे पावडर, इमल्सिफायर, पाम तेल, डिटर्जंट आणि शॅम्पूसारख्या हानिकारक रसायनांचा वापर करून बनावट दूध तयार केले. हे दूध दिसायला, वासाने आणि चवीने खऱ्या दुधासारखे वाटावे यासाठी विशेष मिश्रण केले जात होते. या कारवाईत पुणे, अहिल्यानगर (अहमदनगर), सोलापूर, जालना आणि ठाणे (भिवंडी) या जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी धाडी टाकण्यात आल्या. सुमारे २.५ कोटी रुपयांचा भेसळयुक्त मुद्देमाल, कच्चा माल आणि साहित्य जप्त करण्यात आले. २० हजार लिटर संशयास्पद कृत्रिम दूध जागेवर नष्ट करण्यात आले. मुख्य सूत्रधार सुशांत बबनराव हिंगे (मंचर) याच्यासह १३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाख...
टिप्पण्या