जरांगे पाटलांच्या सभेत तरुणाचा गोंधळ, स्टेजवर जाऊन हिसकावला माईक अन्....

मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले मनोज जरांगे यांची राजगुरुनगरमध्ये सभा सुरु असताना तरुणाने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक तरुण स्टेजवर येऊन त्याने माईक हातात घेत बोलण्याचा प्रयत्न केला.त्याला काही मराठा बांधव उचलून बाजूला नेत होते. मात्र जरांगे पाटील यांनी त्याला थांबवलं. तेव्हा तो जरांगे पाटलांच्या पाया पडला. यावेळी पोलिसांनीही हस्तक्षेप करत त्याला बाजूला नेलं. दरम्यान, या प्रकारामुळे काही काळ गोंधळ झाला होता.

जुन्नरमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडली. या सभेमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून इशारा दिला आहे. मराठ्यांचा उद्रेक होण्याची वाट पाहू नका, तुमच्याकडे 24 तारखेपर्यंतचा वेळ आहे असं जरांगे पाटील यांनी सभेत म्हटलं. दरम्यान, सभेत तरुणाने गोंधळ का घातला याची माहिती मिळू शकली नाही.

काय म्हणाले जरांगे पाटील?

सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासाठी राज्यभरात सभा सुरू आहेत. त्यांची आज जुन्नरमध्ये सभा पार पडली. या सभेमध्ये त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे. तुमच्याकडे 24 तारखेपर्यंतचा वेळ आहे. आमचा संयम सुटू देऊ नका, मराठ्यांच्या उद्रेकाची वाट पाहू नका. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल