: 'मला बोलता येतयं तोपर्यंत चर्चेला या...', मनोज जरांगे यांचं सरकारला आवाहन

मला बोलता येतयं तोपर्यंत चर्चेला या...', मनोज जरांगे यांचं सरकारला आवाहन मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं आहेत. त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. तर आज माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांचा हात थरथरत होता.बोलताना मनोज जरांगे यांच्या हातातून माईक खाली पडला. तर यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज किंवा उद्या चर्चेसाठी यावं असं जरांगे यांनी म्हटलं आहे. 

यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, सरकारशी कोणताही संवाद झालेला नाही, त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील मिळालेली नाहीत. त्यांना माणुसकी समजत नसेल तर त्यांना उत्तर मराठाच आहे. दोन दिवसांत आरक्षण मिळणार असं तानाजी सांवत म्हणत असतील, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन दिवसांत आरक्षण मिळणार असल्याचे का म्हणत नाही. त्यांनी लगेच याबाबत सांगावे, असे जरांगे यांनी म्हटलं आहे. तर मिडियाच्या कॅमऱ्यासमोर चर्चा होत नसते, समोरासमोर येऊन चर्चा केली पाहिजे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. यावर बोलतांना जरांगे म्हणाले की, " त्यांच्या कानात बोळे घातले आहे का? मग मी काल काय म्हणालो होतो. तुम्ही चर्चेला या मराठे तुम्हाला अडवणार नाही. पण फक्त एकदाच चर्चा होणार. जोपर्यंत मला बोलता येत आहे, तोपर्यंत चर्चेसाठी यायले पाहिजे. त्यानंतर येऊन काही फायदा नाही. चर्चेसाठी या आमचे मराठे तुम्हाला कुठेच अडवणार नाही. आरक्षण द्यायचे की नाही एकदाच येऊन सांगायचे, बाकीची वळवळ करायची नाही, ' असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.तुम्ही उपोषण करताय त्याचा अर्ज द्या.. परवानगी घ्या.. म्हणजे तुम्ही आमरण उपोषण तातडीने सुरू केलंय हे सरकारला कळू द्या. आपण आरक्षण घेऊ. कोणीही आत्महत्या करू नका. शांततेत मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. आपली एकजूट फुटू देऊ नका. आपण आरक्षण मिळवणारच. फक्त एकजूट राहा, असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल