मराठा आरक्षणासाठीच्या हालचालींना वेग, संभाजीराजे छत्रपती दिल्लीत दाखल

राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची पुण्यात बैठक होणार आहे.तर दुसरीकडे दिल्लीत देखील हालचाली वाढल्या आहेत. संभाजीराजे छत्रपती दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. मराठा आरक्षणच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती आणि मराठा समाजाचे शिष्टमंडळ केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीराजे यांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची देखील भेट घेतली होती. आता ते केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आरक्षणासाठी संभाजीराजे देखील प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतली होती. त्यानंतर ते आता केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळासह दिल्लीत दाखल झाले आहेत. ते आज दुपारी तीन वाजता केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेणार आहेत.

दरम्यान दुसरीकडे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची शुक्रवारी पुण्यात बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी आवश्यक निकष अंतिम होण्याची शक्यता आहे. तसेच सर्व समाजघटकांचे सर्वेक्षण करण्याबाबत राज्य सरकारची परवानगी मिळण्याबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्ग आयोगाची ही बैठक होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल