मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित करणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल!

धाराशिव;मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित करणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीपान नामदेवराव कोकाटे आणि प्रवीण आप्पासाहेब देशमुख यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हाधि काऱ्यांकडून जमावबंदीचे आदेश असूनही सभेचे आयोजन करण्यात आल्याने या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातील बातमी दिली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर सभा घेत आहेत. त्यांनी सरकारला २४ डिसेंबरचा मुदत दिली  असून त्याआधी ते वातावरण निर्मिती करत आहेत. धाराशिवमध्ये त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जमावबंदी असताना ही सभा आयोजित केल्याचा आरोप करत आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळतंयदिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ सभा चालू ठेवून आदेशाचे उल्लघंन केले, अशा मजकुराची फिर्याद वाशी पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर कलम 188, भा.दं.वि.सं. सह मुंबई पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती मिळली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल