व्हीपचा ट्विस्ट, आमदार अपात्रता सुनावणीत शिंदे गटाला मिळाला महत्त्वाचा पुरावा?

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधिमंडळामध्ये पार पडली. या सुनावणीवेळी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनिल प्रभू यांची उलटतपासणी घेतली.या उलटतपासणीवेळी महेश जेठमलानी यांनी व्हीपच्या मुद्द्यावरून सुनिल प्रभू यांना प्रश्न विचारत अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. दिवसभराची सुनावणी पार पडल्यानंतर महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाच्या व्हीपवर आरोप केले. हा व्हीप बनावट असल्याचा दावा जेठमलानी यांनी केला.
'ठाकरे गटाने 21 जून 2022 ला जारी केलेला व्हीप बनावटी आहे. माझा युक्तीवाद चांगला झाला, सुनिल प्रभू यांनी उत्तरं दिली, आमची केस आणखी मजबूत झाली आहे. 21 जूनला जारी केलेला व्हीप कधीच इश्यू केला गेला नाही. व्हीप बोगस आहे, बनावटी आहे. प्रथमदर्शनी हा व्हीप चुकीचा आहे, असं आमचं म्हणणं आहे. 31 डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करावी लागेल, कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे,' असं जेठमलानी म्हणाले.
शिंदे गटाच्या या युक्तीवादावर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी पलटवार केला आहे. 'व्हीप हा पक्ष प्रमुखाला विचारून जारी केला जातो. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निर्देश दिले की स्पीकरकडे हे प्रकरण पाठवावं आणि निर्णय घ्यावा. या लवादाने त्याचप्रकारे प्रश्न विचारावे, असं अपेक्षित आहे. एक प्रश्न 20-20 वेळा विचारणं सुरू होतं, त्यांचे वकील पॅराग्राफ वाचून तेच तेच प्रश्न विचारत होते,' अशी टीका अनिल देसाई यांनी केली.

'31 डिसेंबरपर्यंत निकाल लागावा, असं आमचं म्हणणं आहे. या संपूर्ण निकालावर देशाची लोकशाही अवलंबून आहे. 10व्या शेड्युलनुसार सगळं झालं पाहिजे. सुनिल प्रभू यांनी व्हीप जारी केलातो त्यांनी पालन केला नाही, म्हणून हे सगळं झालं आहे. समोरच्याला आक्रमक प्रश्न विचारणं ही जेठमलानी यांची स्टाईल असेल, सुनिल प्रभू यांनी व्यवस्थित उत्तरं दिली,' असं अनिल देसाई म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल