मनोज जरांगेंची पाटील यांची मोठी घोषणा! आझाद मैदानात 20 जानेवारीपासून आमरण उपोषण

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी बीड येथे इशारा सभा घेतली. या सभेतून त्यांनी थेट सरकारला इशारा दिला. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. मराठ्यांचे पुढचं आंदोलन आता मुंबईत आझाद मैदानावर होणार आहे.२० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा मनोज जरांगी यांनी केली.

मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावी, सरकारला खूप वेळ दिला. मुंबईत जाताना कुणी हिंसा करु नये. ३ कोटी मराठे मुंबईत येणार आहेत. जो हिंसा करेल तो आपला नाही, असे जरांगे म्हणाले. 

सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, आमच्यावर डाव टाकू नये. आता आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही. आझाद मैदान, शिवाजी पार्क येथे आमरण उपोषण होणार आहे. फक्त मराठा समाजाला डाग लागला नाही पाहीजे, एवढी काळजी घ्यावी, मुंबईला जाण्याची जोरदार तयारी करा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल