200 जेसीबी आणि हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी.; बीडमध्ये मनोज जरांगेचं जंगी स्वागत

राज्यातील मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे  यांनी सरकारला दिलेली डेडलाईन येत्या 24 डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात मराठा आंदोलन पेटणार असल्याचे दिसत आहे.राज्यातील मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली डेडलाईन येत्या 24 डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात मराठा आंदोलन पेटणार असल्याचे दिसत आहे.त्यापूर्वी आज 23 डिसेंबर रोजी बीडमध्ये जरांगे पाटलांची (Manoj Jarange Patil) सभा आयोजित करण्यात आली आहे.

सोलापूर रोडवरील पाटील मैदानावर 100 एकर परिसरात ही सभा होणार आहे. या सभेतून जरांगे पाटलांचा इशारा नेमका सरकारला काय असणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सध्या या सभेची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. या सभेसाठी तब्बल तीन टन खिचडी, ट्रकभर केळी आणि चार लाख पाणी बॉटल्स वाटप करण्यात येणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा आहे. मोठ्या संख्येने मराठा बांधव याठिकाणी एकत्रित येणार आहेत. त्यामुळे आयोजकांनी मोठी तयारी केली आहे. मराठा बांधवांसाठी तब्बल तीन टन खिचडी करण्यात येणार आहे. तर चार लाख पाणी बॉटल्स आणि एक ट्रक केळी वाटप करण्यात येणार आहे.

दुसरीकडे या सभेची तयारी पूर्ण झाली असून बीडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीदरम्यान तब्बल दोनशे जेसीबीच्या माध्यमातून जरांगे यांच्यावर फुलांची उधळण केली जाणार आहे. यानंतर सभा परिसरात हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. सभेच्या परिसरात ड्रोन कॅमेर्‍यासह वेब कॅमेर्‍याची नजर राहणार आहे. दरम्यान सोलापूर- धुळे महामार्गावरील वाहतूक मांजरसुंबा व पाडळशिंगी, माजलगाव फाटा या ठिकाणाहून वळवण्यात आलेली आहे. जरांगे पाटील हे या सभेतून सरकारला काय इशारा देतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

मुस्लिम बांधव करणार स्वागत

बीडमध्ये जरांगे पाटील यांच्या सभेपूर्वी रॅली निघणार आहे. ही रॅली बीड शहरातील बार्शी नाका भागात आल्यानंतर या ठिकाणी मुस्लिम समाज बांधवांकडून भव्य असे स्वागत केले जाणार आहे. या ठिकाणी मुस्लीम समाजातील धर्मगुरू देखील उपस्थित राहणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल