एसटीच्या थांब्यावर३० रुपयात जेवण पाणी न दिल्यास हॉटेलवर होणार कारवाई!

राज्य परिवहन महामंडळाने खासगी हॉटेलवर अधिकृत थांबे करून थांब्याच्या ठिकाणी हॉटेल मालकाने प्रवाशांना ३० रुपयात चहा व नास्ता तसेच नाथजल ही पाण्याची बाटली देणे बंधनकारक केले असताना, हॉटेलमालक जादा पैसे घेत असल्याचा मुद्दा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात काही आमदारांनी उपस्थित केला आहे. या प्रकारामुळे एसटी महामंडळाचे नियोजन व पणन विभागाचे महाव्यवस्थापक जयेश बामणे यांनी राज्यभरातील सर्व विभाग नियंत्रकांना लेखी पत्र पाठवून या प्रकाराची पडताळणी करण्याच्या व सेवा देण्यात कुचराई करणाऱ्या हॉटेलवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.

राज्यात लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या बस या प्रवाशांना चहा, नास्ता घेण्यासाठी महामंडळाने नियुक्त केलेल्या उपहारगृहावर थांबविल्या जातात. या उपहारगृहात प्रवाशांना केवळ ३० रुपयात चहा-नास्ता व नाथजल ही

पाण्याची बाटली देणे बंधनकारक केले आहे. मात्र, बहुतांश उपहारगृहचालक ३० रुपयांत फक्त पाण्याच्या बाटली आणि चहाच देतात. नास्ता देत नाहीत. तसेच नास्ता दिला तर चहा देत नाहीत. ३० रुपयात या तीन वस्तू येत नसल्याचे सांगतात. तर काही हॉटेलचालक ३० रुपयांऐवजी ४० ते ५० रुपये आकारत असल्याचे प्रकार घडत असल्यामुळे राज्यातील काही आमदारांनी या प्रकाराबाबत महामंडळाकडून कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे थेट हिवाळी अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करून नाराजी व्यक्त केली. या प्रकारानंतर राज्यातील विभाग नियंत्रकांना अशा प्रकारच्या हॉटेलमालकांवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर, विभाग नियंत्रकांकडून  संबंधित हॉटेलांची तपासणीदेखील सुरू करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल