पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणारच ; न्यायालयाचे निर्देश

खासदार गिरीश बापट यांच्या निधानानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी निवडणुका घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यादरम्यान बापट यांच्या निधनानंतर गेले 10 महीने ही जागा रिक्त का ठेवली गेली अशी विचारणाही यावेळी कोर्टाने केली.या दरम्यान अन्य राज्यातील निवडणुका आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकांची तयारी करण्यात प्राथमिकता असल्याने पुण्यात लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेतली गेली नाही असा दावा आयोगाने केला. त्यावर पुण्यात माणिपूरसारखी अशांत परिस्थिती होती का ? तसे नसल्यास आयोगाचा हा दावा वैध ठरवला जाऊ शकत नाही असे यावेळी न्यायमूर्ती पटेल आणि न्यायमूर्ती खाता यांच्या खंडपीठाने आयोगाकडे केली. पोटनिवडणूक न घेण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची कृती बेकायदेशीर आणि मनमानी असल्याचा दावा करणारी जनहित याचिका पुण्यातील सुघोष जोशी यांनी दाखल केली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल