गांजा विकायला आला आणि जाळ्यात सापडला..
गांजा विकायला आले आणि जाळ्यात सापडला बार्शीतील घटणा...
बार्शी प्रतिनिधी;
बार्शी शहरात गांजा विक्रीस आणून त्यांची विक्री करत असताना शहर पोलिसांनी छापा टाकून काहीना अटक केले आहे . त्याच्याकडून ६२ हजारांचा गांजा व ४५ हजारांची दुचाकी, असा एक लाख सात हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बुधवार, दि. १३ रोजी रात्री ९ वाजता बार्शी येथील पोलिसांनी उपळाई रोडवरील माढेश्वरी मंगल कार्यालयासमोर कारवाई करण्यात आली.त्याच्याजवळ गेले. असता त्याने दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून अडवून अंगझडती घेतल्यानंतर दुचाकीच्या टाकीवरची बॅग पाहून ती उघडून पाहताच त्यात उग्र वासाची पाने कागदात दिसून आली. हा पदार्थ गांजा असल्याची खात्री झाल्याने त्याला गांजाच्या बॅगसह ताब्यात घेण्यात आले. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. यानुसार ऋत्विक मानतेश सोनेगार (वय २१, रा. पाछा पेठ, सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सोनेगार हा गांजा या अमली पदार्थाची विक्री करण्यास दुचाकीवरून येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या मार्गावर एक अनोळखी इसम दिसताच पोलिस निरीक्षक ढेरे, सहायक पोलिस फौजदार अजित वरपे, पोलिस अंमलदार पवार, जाधव, देशमुख, साळवे, मुलाणी यांनी केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी करत आहेत.दरम्यान, यातील आरोपीस तपासी अपर अधिकारी यांनी बार्शी न्यायालयात न्या. जे. आर. पठाण यांच्यासमोर उभा करण्यात आले. न्यायालयाने १९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे .
टिप्पण्या