विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ सोलापुरात दोन गावांतून हाकलला

केंद्रातील मोदी सरकारने राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी काढण्यात येत असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला सोलापूर जिल्ह्यात दोन गावांतून तीव्र विरोध करून प्रवेश नाकारण्यात आला.बार्शी व करमाळा तालुक्यात हा प्रकार घडला. त्यावेळी गावक-यांचा रोष दिसून आला.

बार्शी तालुक्यातील पांढरी गावात विकसित भारत यात्रेचा रथ आला असता तेथे गावकरी एकत्र आले. यावेळी तरूण आणि वयोवृध्द शेतक-यांनी प्रथम मोदी सरकार या नावाच हरकत घेतली. कांदा व इतर पिकांचे दर गडगडले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केले ? व्यापा-यांचे भले करण्यासाठी शेतक-यांच्या पिकांवर गाढवाचा नांगर फिरविण्यात आला आहे. वाढत्या महागाईत आमचे जागणेच मुश्किल झाले आहे, आशा शब्दांत गावक-यांनी संताप व्यक्त केला. यावेळी काहीजणांनी हातात लाकडी दांडके घेऊन विकसित भारत संकल्प रथ गावातून हाकलून दिला.

करमाळा तालुक्यातील पुनवर गावातही विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ प्रवेश न देता परत पाठविण्यात आला. रथासोबत सरकारी कर्मचा-यांसोबात भाजपचे कार्यकर्ते होते. परंतु गावक-यांनी शेतीमालाच्या घसरलेल्या भावासह वाढलेली महागाई, मोदी सरकारची धोरणे, तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्यावर प्रश्नांची सरबत्ती करून विकसित भारत संकल्प रथाला गावात थांबू न देता परत पाठविला. यावेळी संबंधित सरकारी कर्मचारी व भाजप कार्यकर्त्यांची अडचण झाल्याचे पाहायला मिळाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल