आंतरवाली सराटीमधील बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य

मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत 24 डिसेंबरला संपत असून, या पार्श्वभूमीवर आज आंतरवाली सराटीमध्ये  महत्वाचे बैठक बोलवण्यात आली आहे.ओबीसीमधूनच (OBC) आम्हाला मराठा आरक्षण हवे असल्याची भूमिका मांडणारे मनोज जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होत आहे. दरम्यान, काही तासांत या बैठकीला सुरवात होणार असून, त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केले आहे. "दुसऱ्या समाजाचं आरक्षण काढणार नाही, तसेच ओबीसी यांचे आरक्षण कमी न करता मराठा आरक्षण देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहे.” त्यामुळे ओबीसीमधूनच आरक्षण हवे असल्याची भूमिका घेणारे जरांगे यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 

आंतरवाली सराटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आजच्या बैठकीवर प्रतिक्रिया देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "सरकारचे धोरण स्पष्ट आहे. सरकारची भूमिकाही स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. कुठल्याही इतर किंवा ओबीसी समाजाचा आरक्षण कमी न करता, मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेवर सरकार ठाम असल्याचे,” मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

उद्धव ठाकरेंवर टीका...

मुंबईतील वेगवेगळ्या भागात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहिमेला सुरवात झाली. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या धारावी बचाव मोर्च्यावरूनदेखील टीका केली आहे. "काल काढलेला विकास विरोधी मोर्चा होता. धारावी आशिया खंडातील एक मोठी झोपडपट्टी आहे. तिथे लोक कसे राहतात, कोणत्या परिस्थितीत राहतात. त्यांचं जीवन उंचावलं पाहिजे. त्यांना चांगल्या सोय-सुविधा मिळाल्या पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे. यापूर्वीचा जो कंत्राटदार होता, त्याचं कंत्राट का रद्द करण्यात आलं. जर तुमचा आदानी यांना विरोध असेल, तर यापूर्वीच्या कंत्राटदारालाही का विरोध होता. मला वाटतं काही तडजोडी तुटल्या असतील, त्यामुळे हे सर्व काही घडत असेल. मात्र, सरकार संपूर्ण धारावीकरांच्या मागे आहे. हे लोकं पूर्णपणे विकास विरोधी आहे. प्रत्येकवेळी विकासाचे प्रकल्प थांबवण्याचे काम यांच्याकडून करण्यात येते. परंतु, आमचं सरकार पूर्णपणे धारावीकरांना न्याय देईल. धारावीकरांच्या विकासात कोणत्याही व्यक्तीचा वैयक्तिक फायदा होणार नाही, धारावीतील प्रत्येक माणसाचा आम्ही फायदा करू, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल