नार्वेकरांनी दिलेल्या निकालविरोधात या तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी दिलेला निकाल ठाकरे गटासाठी धक्कादायक होता. शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह हे शिंदे गटाचीच असून त्यांच्या आमदारांना अपात्र करण्यास नकार दिला.यानंतर ठाकरे आणि शिंदे गटात आता अटीतटीची लढाई सुरू झाली आहे. विधानसभा अध्यक्षांचा निकाल आल्यानंतर कायदेतज्ज्ञांनी सल्लासमलत करुन दोन दिवसांनी ठाकरे गटाने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी आता सुप्रीम कोर्टाने सुनावणीची तारीख जाहीर केली आहे.

ठाकरे गटासाठी शेवटची आशा
आधी निवडणूक आयोग आणि नंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय ठाकरे गटाच्या विरोधात गेला आहे. परिणामी शिवसेनेकडे आता शेवटची आशा उरली आहे, ती म्हणजे सुप्रीम कोर्ट. यावेळी निकाल आल्यानंतर ठाकरे गटाने घाई न करता सावध पावलं टाकली आहेत. आपल्या वकीलांशी चर्चा करुन दोन दिवसांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात न्यायालयात 22 जानेवारीला सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेबाबत दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिक दाखल केली होती.दोन्ही गटांनी पक्षाच्या वेगवेगळ्या घटना दिल्या : नार्वेकर

खरी शिवसेना कोणती यावर निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी म्हटले की, "शिवसेनेची घटना काय आहे आणि त्यानुसार पक्ष कुणाचा याचा अभ्यास, निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आलेल्या पक्षाच्या घटनेच्या संदर्भात दोन्ही गटात मतभेद आहेत. 2018 सालची घटना ही यामध्ये महत्त्वाची मानली आहे. घटनेच्या 10व्या सुचीनुसार शिवसेना कुणाची? अधिकृत व्हीप कुणाचा? बुहमत कुणाचं हे ठरवणं होतं, 2018 मधील घटनेच्या दुरुस्तीची दोन्ही पक्षकारांना पूर्ण कल्पना होती. त्यावेळी केलेली घटनादुरूस्ती ही त्यावेळी सर्वांच्या संमतीने. घटना, नेतृत्व, विधिमंडळ पक्षाचं बहुमत, हे पक्ष ठरवताना महत्वाचे घटक होते. शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. म्हणून एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र करता येणार नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल