मुंबईत ६ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश; काय आहे कारण? जाणून घ्या

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक मोठ्या प्रमाणात दादरच्या शिवाजी पार्क येथे जमतात. यावेळी कुठलाही घातपात, किंवा अन्य घटना होऊ नयेत यासाठी मुंबई पोलिसांकडून कलम १४४ अंतर्गत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.आणि मिरवणुका काढण्यास ६ फेब्रुवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान मनोज जरांगे यांच्यासह हजारो मराठा कार्यकर्त्यांनी 26 जानेवारीपासून मुंबईत मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्याची घोषणा केली असून मुंबईच्या दिशेन येतायेत आहेत.
जरांगे यांनी सरसकट मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे गजबजलेल्या मुंबईत मराठा समाजाच्या आंदोलनामुळे शांतता भंग होऊ शकते मालमत्तेची हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी आंदोलन मोर्चे काढण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश बुधवारपासून लागू झाला असून पुढील 15 दिवस लागू राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्याही परिस्थित येणार असल्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे प्रशासनानेही आंदोलनाला कोणतीही आडकाठी नसल्याचं म्हटलं आहे. मराठा समाजाचे सुमारे दोन ते अडीच कोटी लोक मुंबईत येणार आहेत. 26 जानेवारीला मराठा समाजातील लोक आपली ताकद दाखवतील, असा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे मोर्चादरम्यान जरंगे यांचे जंगी स्वागत करण्यात आले शिक्रापूरमध्ये जरांगेंसोबत सुमारे 750 वाहनांच्या ताफ्यासह किमान 15,000 कार्यकर्ते होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल