बनावट डॉक्टरांविरुध्द कारवाई

वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना ॲलोपॅथीचा औषधसाठा बाळगून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या आणखी तीन बनावट डॉक्टरांविरुद्ध धुळे जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे.सुहास वाघ (४३, रा.प्लॉट दोंडाईचा), राजु मलिक (रिटाणे, साक्री) आणि अमोल सूर्यवंशी (३६, नरव्हाळ,धुळे) अशी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या बनावट डॉक्टरांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार आरोग्य विभाग आणि पोलीस खात्याने संयुक्तिकपणे ही कारवाई केली. वैद्यकीय व्यवसायाचा परवाना किंवा शिक्षण नसताना या बनावट डॉक्टरांनी स्वतःजवळ ॲलोपॅथीचा औषधसाठा ठेवला होता, असा आरोप आहे.

बनावट डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलीस अधीक्षक धिवरे यांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना बनावट डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पाच ते सात जानेवारी या कालावधीत धुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये छापा टाकून पोलिसांनी तपासणी केली. या तपासणीत नव्याने आढळलेल्या तीन बनावट डॉक्टरांविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ च्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.यापूर्वीच्या तपासणीत जिल्ह्यात सात बनावट डॉक्टर आढळले होते. त्यांच्याविरुध्दही कारवाई करण्यात आली. बनावट डॉक्टर हे रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळत असतात. औषधांची मात्रा चुकल्यास रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. असे असतानाही बनावट डॉक्टर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बिनधास्तपणे व्यवसाय करत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल