ज्येष्ठांनो! ३ हजार हवेत, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे 'मुख्यमंत्री वयोश्री योजना' सुरू करा अर्ज...

राज्य शासनाकडून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वयाची ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठांसाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे 'मुख्यमंत्री वयोश्री योजना' राबविली जात आहे.ज्येष्ठ नागरिकांना वयोमानपरत्वे येणाऱ्या दिव्यांगत्व, अशक्तपणावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साह्य साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी व मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्राद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.

शारीरिक, मानसिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी एकरकमी आर्थिक साहाय्य देण्याच्या 'मुख्यमंत्री वयोश्री' योजनेचा जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाकडन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त समितीचे अध्यक्ष

या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करणे, लाभाथ्यर्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे, लाभार्थ्यांचे आधार क्रमांक, बैंक खाते यांची माहिती गोळा करणे आदी कामे नोडल एजन्सी/केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था यांच्या माध्यमातून आयुक्त, समाजकल्याण पुणे यांच्याद्वारे करण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड, योजनेची अंमलबजावणी आणि देखरेखीच्या उद्देशाने ग्रामीण भागाकरिता जिल्हाधिकारी व शहरी भागाकरिता आयुक्त, महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.योजनेतून ही खरेदी करा

मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशातून चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर या गोष्टी खरेदी करता येणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाने निर्गमित केला आहे.

आवश्यक कागदपत्रे. ✓

■ आधारकार्ड, मतदान कार्ड, ■ बँक पासबुकची झेरॉक्स, ■ पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, ■ स्वयं-घोषणापत्र, ■ अन्य विहित नमुन्याचे कागदपत्र

काय म्हणतात अधिकारी? मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी स्वतंत्र पोर्टल विकसित केले जाणार आहे, त्याची प्रक्रिया सुरू आहे. केंद्राच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर ही योजना राज्य सरकार राबवत आहे, त्यामुळे अर्ज करण्याची प्रक्रिया ही सारखीच असणार आहे. योजनेसंबंधी मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. लवकरच याबाबतच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर आम्ही जनजागृती, प्रचार, प्रसार करू.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल