विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता? मुंबईत निघणार घामाच्या धारा

 आठवड्यात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने मुंबईत उष्णतेसह घामाच्या धारा निघणार आहेत.

मुंबईसह राज्यात या आठवड्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत पारा 35 अंशाच्या वर गेला असून राज्यात अनेक ठिकाणी 40 अंशापेक्षा जास्त तापमान आहे. त्यामुळे राज्यात दिवसा उन्हाचा चटका तर रात्री उकाडा जाणवत आहे. मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने या आठवड्यात मुंबईत उकाडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईसह कोकणाशिवाय राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. विदर्भात काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान 40 अंशांवर गेले आहे. ते सरासरी कमाल तापमानापेक्षा ३ ते ४ अंश सेल्सिअसने अधिक आहे. या आठवड्यात दिवसा उष्णतेची काहिली, तर रात्री उकाडा जाणवणार आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल