नणंद विरुद्ध भावजय सामना निश्चित ! बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर..

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे  यांना उमेदवारी देण्यात आली.शरद पवार यांच्या गटाची उमेदवारी जाहीर होताच अजित पवार गटाने देखील सुनेत्रा पवार यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करत उमेदवारी जाहीर केली.

गेल्या काही दिवसांपासून बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांनी काम सुरु केल्याचे पाहायला मिळत होते.त्यामुळे बारामतीमध्ये खरच पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर आज राष्ट्रवादीच्या दोन्हही गटांनी बारामतीमधील आपले उमेदवार जाहीर केले. 

सुप्रिया सुळे यांच्या उमेद्वारीनंतर सुनेत्रा पवार यांची उमेदवारी देखील निश्चित झाल्याने बारामतीत आता नणंद विरुद्ध भावजय सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाने जाहीर केल्या 5 जागा
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी  पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे शिरुर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे  वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे  दिंडोरी मधून भास्करराव भगरे तर नीलेश लंके  यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल