नावाप्रमाणेच राजेशाही थाट मिरवणाऱ्या या वास्तुंची बांधणी

नावाप्रमाणेच राजेशाही थाट मिरवणाऱ्या या वास्तुंची बांधणी देखील स्वतः छत्रपती शाहु महाराजांच्या पुढाकारानेच झाली. याच कालावधीत संगीत आणि नाटयकलेची बीजेदेखील कोल्हापुरात रुजली. यांच सारं श्रेय जात पॅलेस थिएटरला..... अर्थात आजच्या केशवराव भोसले नाट्यगृहाला.

              रोम भेटीवरून परतल्यानंतर तिथे असलेले ऑलिंपिक मैदान व त्याला लागुनच असलेल नाटयगृह यांची प्रेरणा घेऊन छत्रपती शाहु महाराजांनी या वास्तु उभारल्या. सन 1913 ते 1915 या कालावधीत बांधल्या गेलेल्या या नाट्यगृहाचा रंगमंच 20 फुट बाय 34 फुट इतका प्रशस्त असून रंगमंचा खाली आवाज घुमण्यासाठी पाण्याने भरलेला 10 फुट खोल खड्डा आहे. पाणी खेळते राहण्यासाठी पक्की गंटारी बांधली आहेत. नाटयगृहास कोठेही खांब नाहीत. कुठेही बसले तरी नाटक व्यवस्थित दिसावे व स्पष्ट आवाज ऐकु यावा अशी रचना केलेली आहे. नाट्यगृह आखीव, रेखीव व राजेशाही थाटाचे असुन त्या काळी राजघराण्यातील स्त्रियांना नाटक पाहता       
यावे म्हणून बाल्कनीमध्ये दोन बंदिस्त खोल्यांची विशेष रचना करण्यात आलेली आहे. 

              पण आज भीषण आगीमुळे नाट्यगृहाचे अवस्था बगवत नाही. पुन्हा नव्याने नाटयगृहाचे रचना होईल पण त्या नाट्यगृहातील जुन्या कित्येक वर्षाच्या आठवणी आणि त्या नाटयगृहाशी जोडलेल्या गोष्टी यांची बांधणी कशी करणार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल