छत्रपती संभाजीनगर: बिल्डर कुणाल बाकलीवालची श्रीमंतीची नशा पोलिसांनी अवघ्या 24 तासात उतरवली

छत्रपती संभाजीनगर: बिल्डर कुणाल बाकलीवालची श्रीमंतीची नशा पोलिसांनी अवघ्या 24 तासात उतरवली 
छत्रपती संभाजीनगर शहरात 26 जानेवारी 2025 रोजी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने एक मोठा वाद निर्माण केला. प्रसिद्ध बिल्डर कुणाल बाकलीवाल ने सुसाट वेगाने गाडी चालवताना वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली आणि त्यांना शिवीगाळ करत धमकी दिली. "तू मला ओळखले नाही का, बुढ्ढे तेरेको ड्युटी करनी आती क्या?" अशी अर्वाच्च भाषा वापरून पोलिसांना सस्पेंड करण्याची धमकी दिली.

या प्रकारानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि 24 तासांच्या आत कुणाल बाकलीवालला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याची मस्ती उतरवण्यासाठी तपासाचे चक्र वेगाने सुरु केले.

व्हिडीओमध्ये कुणाल बाकलीवाल पोलिसांना गाडीतून खाली उतरायला नकार देत, "मला ओळखत नाही का? दोन तासांत तुम्हाला सस्पेंड करतो," अशी धमकी देताना दिसत होता. यावेळी त्याने पोलिसांना गप्प बसण्यास सांगितले. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला, आणि पोलिसांनी त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल