महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा – हवामान विभागाचा अलर्ट

महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा – हवामान विभागाचा अलर्ट

मुंबई – महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढत असतानाच हवामान विभागाने पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि ओडिशापासून तमिळनाडूपर्यंत निर्माण झालेल्या हवेच्या द्रोणीय स्थितीमुळे राज्यात पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे.

हवामान विभागानुसार, मंगळवार (1 एप्रिल) आणि बुधवार (2 एप्रिल) रोजी राज्याच्या बहुतांश भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच ताशी 40 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या काळात राज्यात कमाल तापमान 35 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.

विदर्भात तापमानाचा पारा 42 अंशांवर
विदर्भातील ब्रह्मपुरी व अकोला येथे सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नागपूरमध्येही रविवारी तापमान 41.2 अंशांवर पोहोचले. गोंदिया, वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि गडचिरोलीमध्ये तापमान 40 अंशांच्या आसपास आहे. विदर्भात पुढील दोन दिवस तापमान कायम राहणार असून त्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. शेतकरी व नागरिकांनी हवामानाच्या स्थितीनुसार योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल