**सुलाखे शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे NEET, JEE Mains, MH-CET मध्ये दमदार यश**
**सुलाखे शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे NEET, JEE Mains, MH-CET मध्ये दमदार यश**
**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी, दि. 25 जून 2025**: सुलाखे इंग्लिश मिडीयम स्कूल, बार्शीचे माजी विद्यार्थी चि. आर्यन चेट्टी आणि चि. ऋषिकेश ढाकणे यांनी NEET 2024-25, JEE Mains आणि MH-CET या परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. आर्यन याने NEET मध्ये 720 पैकी 565 गुण, तर ऋषिकेश याने 561 गुण मिळवले. JEE Mains मध्ये आर्यनला 98.24 टक्के आणि MH-CET मध्ये दोघांनाही 99.59 टक्के गुण मिळाले.
या यशानिमित्त आज शाळेत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी मुख्याध्यापक श्री. महाजन सर, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरवले. बार्शी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. आनंद सुलाखे, सचिव श्री. अनंत कवठाळे व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
महाजन सर म्हणाले, “आर्यन आणि ऋषिकेश यांचे यश आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. त्यांची मेहनत इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देईल.” श्री. सुलाखे यांनीही विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे कौतुक केले. आर्यन आणि ऋषिकेश यांनी यशाचे श्रेय शाळेच्या मार्गदर्शनाला आणि पालकांच्या पाठिंब्याला दिले.
या यशामुळे दोघांनाही नामांकित वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची संधी मिळेल. बार्शी एज्युकेशन सोसायटीने पुढील शिक्षणासाठी सहकार्याचे आश्वासन दिले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना बार्शीकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
KDM NEWS
Kiran mane
8698707909
लेखक, पत्रकार