**सोलापूरात 400 मीटर सिंथेटिक ट्रॅकचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन**

**सोलापूरात 400 मीटर सिंथेटिक ट्रॅकचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन** 

**KDM NEWS प्रतिनिधी**सोलापूर, दि. 28 जुलै 2025* जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका येथे 400 मीटर सिंथेटिक ट्रॅकच्या निर्मितीचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आज संपन्न झाले. जिल्हा क्रीडा संकुल समिती आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, क्रीडा प्रशिक्षक आणि खेळाडू उपस्थित होते.

या ट्रॅकमुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षण सुविधा मिळतील. पालकमंत्री गोरे यांनी शासनाच्या क्रीडा विकासासाठीच्या कटिबद्धतेवर भर देत सोलापूरच्या खेळाडूंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्याचे आवाहन केले. हा प्रकल्प सोलापूरच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देईल, अशी अपेक्षा आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल