**उपमुख्यमंत्री शिंदे यांचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन; चालत मंदिरात दर्शन, भाविकांच्या सोयीस प्राधान्य**

**उपमुख्यमंत्री शिंदे यांचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन; चालत मंदिरात दर्शन, भाविकांच्या सोयीस प्राधान्य** 

**KDM NEWS प्रतिनिधी**पंढरपूर, दि. ३ जुलै २०२५: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आषाढी यात्रा सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन विठुरायाचे आणि रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनीही श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरात लाखो वारकरी दाखल झाले असून, दर्शन रांगेत भाविकांची प्रचंड गर्दी आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन मिळावे, यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली.

मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा शाल आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचाही सत्कार करण्यात आला. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे काम सुरू असून, या कामांची पाहणी उपमुख्यमंत्र्यांनी केली. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी या कामांबाबत सविस्तर माहिती दिली.

**भाविकांच्या सोयीसाठी चालत प्रवास**  
चौफाळा ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर वाहनमुक्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. राजशिष्टाचारानुसार अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी मंदिर समितीने वाहनांची व्यवस्था केली होती. मात्र, भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वाहतुकीमुळे कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी चौफाळा ते मंदिरापर्यंत चालत जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले.

या प्रसंगी आमदार समाधान आवताडे, राजू खरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि व्यवस्थापक मनोज श्रोत्री उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांच्या या भेटीने आषाढी यात्रेदरम्यान भाविकांना सुलभ दर्शन मिळावे आणि मंदिराचे सांस्कृतिक-आध्यात्मिक महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी राज्य सरकारची बांधिलकी अधोरेखित झाली.

KDM NEWS प्रतिनिधी 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल