**करमाळ्यात पोलिसांचा दणका! ११ लाखांचा प्रतिबंधित पानमसाला, तंबाखूसह वाहन जप्त; एकाला अटक**
**करमाळ्यात पोलिसांचा दणका! ११ लाखांचा प्रतिबंधित पानमसाला, तंबाखूसह वाहन जप्त; एकाला अटक**
**KDM NEWS प्रतिनिधी**करमाळा, २९ जुलै २०२५**: सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे सोमवारी (२८ जुलै २०२५) पहाटे १:३० वाजता पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत ३.२१ लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूसह ८ लाख रुपये किमतीचे महिंद्रा मराझो वाहन (MH 20 FU 7246) जप्त केले. याप्रकरणी राजेंद्र विनायक बावीस्कर (वय ४०, रा. छत्रपती संभाजीनगर) याला अटक करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील यांच्या फिर्यादीनुसार, महाराष्ट्र शासनाने १६ जुलै २०२५ च्या अधिसूचनेनुसार (क्र. असुमाअ/अधिसूचना-४११/२०२५/७) २० जुलै २०२५ पासून एक वर्षासाठी पानमसाला आणि तंबाखूच्या उत्पादन, साठवणूक, विक्री व वाहतुकीवर बंदी घातली आहे. करमाळा पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून जातेगाव येथे वाहन तपासणी केली असता, १,६५० पाकिटे हिरा पानमसाला (२,१४,५०० रुपये) आणि १,६५० पाकिटे रॉयल ७१७ तंबाखू (१,०७,२५० रुपये) आढळले. एकूण मालमत्तेचे मूल्य ११.२१ लाख रुपये आहे.
पंचसाक्षीदार अक्षय परदेशी आणि प्रणव राठोड यांच्या उपस्थितीत तपासणी झाली. बावीस्कर याने साठा कर्नाटकातून छत्रपती संभाजीनगरला नेत असल्याचे सांगितले, मात्र खरेदी बिल सादर केले नाही. त्याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या कलम २६, २७, ३०, ५९ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२३, २२३, २७४, २७५ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. साठा आणि वाहन जप्त करून करमाळा पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले असून, नमुने विश्लेषणासाठी पाठवले आहेत. पुढील तपास सुरू आहे.
टिप्पण्या