**बार्शी : अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीस १० वर्षांचा सश्रम कारावास**

**बार्शी : अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीस १० वर्षांचा सश्रम कारावास** 

**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी, दि. २९ जुलै २०२५* : बार्शी शहरात २८ मे २०२२ रोजी रात्री घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात आरोपी संदीप मोहन लंकेश्वर (वय ३२, रा. बार्शी, ) याला माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. विक्रमआदित्य मांडे यांनी दोषी ठरवत १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच ६,००० रुपये दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची तरतूद करण्यात आली.

**घटनेचा तपशील**  
बार्शी-लातूर रस्त्यावरील ओढ्याच्या काठावर रात्री १:१० वाजता पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिचा मित्र बोलत बसले असताना आरोपीने मुलीच्या मित्राला ढकलले. “प्रेमसंबंध घरी सांगेन,” अशी धमकी देत मुलीवर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केले. तिने सुटकेची विनवणी केली असता, आरोपीने तिला चापट मारून गप्प बसण्याची धमकी दिली.

**गुन्हा दाखल व तपास**  
या घटनेनंतर बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५६/२०२२ अंतर्गत भा. द. वि. कलम ३७६, ३२३, ५०६ आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याच्या कलम ४, १२ अन्वये गुन्हा नोंदवला गेला. तपासी अधिकारी पो. उपनिरीक्षक प्रवीण शिरसाट यांनी पुरावे गोळा करत आरोपीला अटक केली आणि न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

**न्यायालयीन प्रक्रिया**  
सुनावणीत पीडित मुलगी, तिचा मित्र आणि वैद्यकीय तज्ज्ञ यांच्या साक्षी निर्णायक ठरल्या. सरकारी वकील श्री. दिनेश देशमुख आणि प्रदीप बोचरे यांनी १५ साक्षीदार आणि पुराव्यांच्या आधारे खटला लढवला. न्यायालयाने पुरावे ग्राह्य धरत आरोपीला दोषी ठरवले.

**प्रमुख योगदान**  
उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक श्री. बालाजी कुकडे आणि कोर्ट पैरवी अधिकारी पो. नाईक गणेश ताकभाते यांनी तपास आणि खटल्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल