**बार्शीत धार्मिक भावना भडकवणारी फेसबुक पोस्ट; सवारीची विटंबना करणाऱ्या सोहेलविरुद्ध गुन्हा दाखल**
**बार्शीत धार्मिक भावना भडकवणारी फेसबुक पोस्ट; सवारीची विटंबना करणाऱ्या सोहेलविरुद्ध गुन्हा दाखल**
**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी, ४ जुलै २०२५**: बार्शी शहरात धार्मिक भावना भडकवणारी फेसबुक पोस्ट आणि व्हिडीओ शेअर केल्याप्रकरणी सोहेल राजू खड्डेवाले याच्याविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २९९ अंतर्गत हा गुन्हा नोंदवला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दिनांक ४ जुलै २०२५ रोजी पहाटे ००:१५ वाजता, मंगळवार पेठ येथील सोहेल खड्डेवाले याने त्याच्या फेसबुक अकाउंटवरून (Sohel Khaddewale) आक्षेपार्ह व्हिडीओ टाकला. यात आगीन पावडा येथे मुस्लिम समाजातील व्यक्ती सवारी घेऊन जात असल्याचे दाखवत "लिंबू याला मारिला" हे गाणे एडिट केले होते. तसेच, पोस्टमध्ये "अपने पास भी है ऐसा.... हराम हराम हराम..." आणि कमेंटमध्ये "मोहरम में के नाजायज औलाद अगर कमेंट में आये ना बहिण उचलुंगा" असे आक्षेपार्ह मजकूर लिहिला. यामुळे लिंबूवाली सवारी मानणाऱ्या मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या.
देशमुख प्लॉट येथील बिलाल आबूतालिब शेख (वय २६, व्यापारी) यांनी याबाबत तक्रार दाखल केली. त्यांनी म्हटले की, आरोपीच्या कृत्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन सामाजिक सौहार्द बिघडले आहे. बार्शी शहर पोलीस ठाण्यात ठाणे दैनंदिनी क्रमांक ००२/२०२५ अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला. पोलीस निरीक्षक बलाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉं मुढे (बक्कल क्र. १६६५) तपास करत आहेत.
पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावर संयम राखण्याचे आणि धार्मिक भावना भडकवणाऱ्या पोस्ट टाळण्याचे आवाहन केले आहे. तपास सुरू असून, लवकरच आरोपीला ताब्यात घेतले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.