**बार्शीतील आषाढी वारी आणि मोहरम सणानिमित्त कडक बंदोबस्त; सलोख्याचे आवाहन**
**बार्शीतील आषाढी वारी आणि मोहरम सणानिमित्त कडक बंदोबस्त; सलोख्याचे आवाहन**
**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी, दि. ४ जुलै २०२५: बार्शी शहरात येत्या ६ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशी आणि मोहरम सण एकाच दिवशी साजरे होणार आहेत. आषाढी एकादशीनिमित्त भगवंत मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमणार आहे. हे मंदिर बार्शीतील वारकरी परंपरेचे केंद्र असून, आषाढी एकादशीला येथे रथ मिरवणूक काढली जाते, जी भक्ती आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. याचवेळी, मुस्लिम समाजाचा मोहरम सणही साजरा होणार आहे. या दोन्ही धार्मिक कार्यक्रमांसाठी बार्शी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे.
पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे. “आषाढी वारी आणि मोहरम मिरवणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी लहान मुलांचे आणि मौल्यवान दागिन्यांचे रक्षण करावे. काही अडचण आल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा,” असे त्यांनी सांगितले.
दोन्ही समुदायांनी सौहार्दाने सण साजरे करावेत, असे आवाहन पो. नि. कुकडे यांनी केले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी